Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

“ शिखर फाऊंडेशन ” कडून तैलबैला सर

दणकट, बळकट, आणि कणखर सह्याद्री च्या अंगा-खांद्यावर निसर्गाच्यास चमत्कारातून निर्माण झालेला , आणि मुळशी धरणाच्या निळ्याशार जलाशयाच्या पार्श्ववभूमिवार उभा असलेला, बेलाग आणि बुलंद दुर्ग दुर्गेश्वर अर्थात तैल बैला . आणि हाच बेलाग दुर्ग सर करण्याचा निर्धार मना मध्ये ठेवुन टीम “शिखर" च्या १२ साहसी वीरानी टीम लीडर जालिंदर वाघोले यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २१ नोव्हेंबर १५ रोजी तैलबैला च्या दिशेने प्रस्थान ठेवले .
लोणावळा ते ताम्हिनी रस्त्याने मावळ मुळशी च्या सिमेवरील खिंड उतरून उजव्या हाताचे वळण घेऊन तैलबैला भिंतीच्या अडोश्याला विसवलेल्या तैलबैला गावात दिं.२१ नोव्हेंबर च्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आमची “ शिखर " ची टीम पोहचली. गाड्या पार्क कारूण लागणाऱ्या समानाची बॅग मध्ये विभागणी करुण टीम ने तैलबैला दुर्गा च्या दिशेने कूच केली . कडाक्याच्या थंडीत पडणाऱ्या जलधारा आंगावर झेलीत ; ४० मिनीटाच्या सरळ चढणी नंतर सर्व जण दुर्गा वरील भैरावनाथाच्या मंदिरात पोहचले . बरोबर आणलेलेल्या शिदोरीवर ताव मारून ; तैलबैल च्या भिंती चे काळोखात भासणारे अजस्त्र रूप डोळ्यात साठवत टीम आंधाराच्या कुशीत निद्राधीन झाली .
दिनांक २२/११/१५ भल्या सकाळीच धुक्याची चादर दूर करत टीम जागी झाली , तेव्हा समोरचे द्रष्य अगदीच विलोभनीय होते , ज्या प्रमाणे एकाद्या मेंढपाळा ने पिकात घुसलेल्या मेंढ्याना हुसकावे , त्या प्रमाणे सूर्याची किरणे सह्याद्रित पसरलेल्या धुक्याला हुसकवत होती .
टीम चे मार्गदर्शक विवेकानंद तापकीर यांनी तैलबैलाच्या खिंडीतील उत्तरेकडील भिंतीची पाहणी करुण पुढील सुचना दिल्या त्या प्रमाणे टीम " शिखर ” तयारीला लागली. २३० फुटाची सरळ सोट भिंत सर करण्यासाठी संजय भाटे यांना  प्रथम चढाईची जवाबदारी देत, जालिंदर वाघोले यांनी बिलेअर ची महत्त्व पूर्ण भूमीका स्वीकारली.सकाळी ८:०० वाजता जय भवानी ! जय शिवाजी ! गणपती बप्पा मोरया ! आशा गर्जना देत संजय ने चढ़ाईला सुरुवात केली, कोवळ्या उन्हाची किरणे पाठीवर घेत संजय ने पहिल्या टप्याची चढाई दिमाखात पूर्ण करत रोप फिक्स केला, त्या नंतर संजय च्या पाठोपाठ जालिंदर ने ही पहिल्या टप्या पर्यंत  ची चढाई लिलाया पूर्ण केली .
एव्हाना उन्हाचा पारा वाढत होता; जालिंदर नंतर इतर सदस्य ही चढ़ाई साठी तयार होत होते, संजय ने थोड्याशा विश्रांती नंतर दुसऱ्या आणि सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या टप्यावर चढ़ाईला सुरुवात केली. साधारणतः २५ ते ३० फुटाची सरळ उभी चढन आणि त्यानंतर ३० ते ३५ फुटाची ट्राव्हर्स पूर्ण करत फक्त ऐकाच व्यक्तीला उभा राहता येईल ऐवढ्या छोट्या स्टेशन वर रोप फिक्स केला . त्यानंतर मात्र जागे आभावी जालिंदर ला वर जाता न आल्यामुळे संजय ने पुढच्या आणि शेवटच्या टप्याची चढाई सुरु केली, जालिंदर आणि संजय च्या संवादा मध्ये आडथळे येत असताना सुध्दा संजय ने अनुभवाच्या जोरावर व व्हॉकिटॉकी द्वारे संपर्क साधत २० फुटाची सरळ चढन असलेला टप्पा पार करत बरोबर १०:१५ मिनिटांनी तैलबैला शिखरावर पाय ठेवत जय भवानी! जय शिवाजी! च्या रणभेदी गर्जना देत “शिखर” फाऊंडेशन चे निशान फडकवले . त्या नंतर जालिंदर वाघोले यांनी जोश पूर्ण चढाई करत तैलबैलाच्या माथ्यावर पायल ठेवले .
त्यानंतर सर्पमित्र अजिंक्य उनवने , सुरेश ससार , मयुरेश देशपांडे , “शिखर" चे मार्गदर्शक विवेकानंद तापकीर , सुधीर गायकवाड , शिवाजी आंधळे , भास्कर मोरे , राजेश शर्मा यांनी झुमरिंग करत तैलबैला सर केला . बाळासाहेब भिलारे आणि सुनील देवकर यांचे ही सहकार्य लाभले .
पुन्हा: एकदा सर्वांनी जय भवानी! जय शिवाजी! चा जय घोष करत आनंद साजरा केला.
सकाळ पासून सूर्य आग ओकत होता पण अत्ता मात्र आकाशात ढगांची दाटी होऊन पावसाची शक्यता निर्माण झाल्यामुळे सर्वानी एक-एक करत रॅपीलिंग ला सुरुवात केली , शेवटी संजय भाटे आणि विवेक तापकीर वाईंडप करत खाली आले .
एव्हना काळ्याकुट् मेघातून गडगडाटासह सह्याद्रीच्या शिखरांवर जलाभिषेक सुरु झाला होता, आशातच गरमा - गरम मसाले भातावर ताव मारून टीम परतीच्या प्रवासाला लागली ती साह्यसुळक्यांचा आदर मना मध्ये ठेऊनच .
शिवाजी आंधळे
९८५०५५५९५२.

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Feb 11, 2015

No Comments

Leave a Reply