Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

शिखर फाऊंडेशनच्या गिर्यारोहकांची नानाच्या अंगठ्यावर यशस्वी चढाई

नव वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती ने करत असतो, पण गिर्यारोहकांची पद्धत जरा अनोखीच असते ;  आणि “शिखर फाऊंडेशन” च्या गिर्यारोहकांनी याच अनोख्या पद्धतीला साजेस आस सेलिब्रेशन साजर केलं ते सातवाहन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नव्हे - नव्हे त्या काळातील व्यापारी राजमार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील  नाणेघाटातील नानाच्या आंगठ्यावर .
जुन्नर तालुका हा गिर्यारोहकांची पंढरी म्हणून ओळखला जातो , जुन्नर च्या जवळच असलेला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणजे हारीशचंद्राचा कोकण कडा आणि त्या खालोखाल मोरोशीचा भैरवगड आणि त्याच्याच तोडीचा हा नानेघाटातील नानाचा अंगठा ह्या सह्याद्रीच्या या तिन्ही कातळ भिंती नेहमीच गिर्यारोहकांची कसोटी पाहत असतात , पण अंगामध्ये उत्साह संचारलेल्या शिखर च्या गिर्यारोहकांनी नवीन वर्षाचा मुहूर्त साधून नानाच्या आंगठ्यावर नवीन वर्षांचे स्वागत करण्याच्या इराद्याने  नाणेघाटाच्या दिशेने प्रस्थान ठेवले .
घाट माथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी डोंगर तोडून तयार केलेली निमुळती वाट म्हणजेच नाणेघाट आणि या वाटेमुळे डाव्या बाजूच्या डोंगराचा हाताची मूठ बांधून अंगठा वर काढावा त्या प्रमाणे  तयार झालेला आकार म्हणजेच नानाचा अंगठा , याच अंगठायावर प्रस्तारारोहन करण्यासाठी “शिखर” चा चूमू खिंडीच्या बाजूला असलेल्या गुहेशेजारून डोंगराला पडलेल्या कपारीवजा वाटेने स्वतःचा तॊल सावरत जेमतेम चार जण उभा राहू शकतील आशा जागे पर्यंत पोहचला . खाली ३००० ते ३५००  हजार  फूट खोल दरी आणि वर ३०० फुटाचा अभ्येद्य काताळातून निर्माण झालेला अंगठा आणि येथूनच सुरु होतो अंगठ्यावर चढण्याचा मार्ग .
एका बाजूला धुक्याच्या रजईत पाय पोटात घेऊन पडलेला कोकण आणि दुसऱ्या बाजूला सूर्य किरणांच्या आणि आमच्या मध्ये उभा असलेला साह्यकडा ,आणि याच साह्यकड्यावर गिर्यारोहकांनी नजर टाकत गणपती बप्पा मोरया ! जय भवानी ! जय शिवाजी चा गजर करत अंगठ्याची मनोभावे पूजा केली . आणि विवेक तापकीर व प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शना नुसार प्रथम चढाईचा मान स्वीकारत संजय भाटे चढाई साठी सज्ज झाला .
अनेक सुळक्यांच्या चढाईचा अनुभव पाठीशी असलेला संजय ने पहिल्या टप्यावर चढाईला सुरुवात केली , गाराठलेल्या बोटे खडकाच्या फटीत आडकवत संजय चढाई करत होता , आणि त्याच्या सुरक्षा दोराची जावाबदारी अनुभवी प्रवीण सांभाळत होता . सर्वात कठीण असलेला व सरळ अंगावर असणार हा टप्पा संजय ची कसोटी पाहत होता , पण संजय ही अतिष्य संयमाने चढाई करत होता , संयमाच्या आणि कोकणकडा वीर विवेक तापकीर यांच्या मार्गदर्शना च्या जोरावर संजय ने १०० फुटाच्या  पहिला टप्पा पार केला .
आता वेळ होती दुसऱ्या टप्प्याची ; पहिल्या टप्यापेक्षा चढाईला सोपा असलेला पण क्लाइंब रूट हा ट्रायव्हर्स असल्यामुळे बिलेयर व क्लाईंबर यांच्या मध्ये संपर्क होऊ शकत नसल्यामुळे संजय ला चढाई मध्ये अडचणी निर्माण होत होत्या , तरी पण ‛ इच्छा तेथे मार्ग ’ या उक्ती प्रमाणे संजय चढाई करत दुसर्या टप्प्या पर्यंत पोहचला . त्या नंतर त्याचा पाठोपाठ प्रवीण पवार याने पण दुसऱ्या टप्प्याची चढाई पूर्ण केली .
एव्हाना सूर्य डोक्यावर तळपू लागला होता ; पण तळपत्या उन्हात सुधीर गायकवाड , अजिंक्य उनवने आणि तन्वीर गायकवाड झुमरिंग करत वर येण्याची तयारी करत होते , आज विशेष म्हणजे संजय ला बिलेयर म्हणून प्रविण पवार सारखा उच्च दर्जाचा गिर्यारोहक लाभला होता त्या मुळे संजय ही आज जोश पूर्ण चढाई करत होता एक-एक टप्पा लिलाया पार करत हिता ; आता संजय तिसऱ्या टप्प्या च्या दिशेने झेपावला होता , समोरची चढाई ओहर हँग असल्यामुळे चढताना कसोटी लागत होती , पण कोकण कड्याचे ध्येय बाळगणारे “ शिखरचे ” गर्यारोहक थांबतील ते कसे ? आणि शेवटी तिसऱ्या टप्यावर स्वार होण्यात संजय यशस्वी झाला .
आता मात्र सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते “ शिखर ” नजरेत आले होते , मुळातच अंगठ्याच्या टोकावर असलेला भगवा ही जोरात फडफडत होता , इकडे झुमरिंग करत अजिंक्य दुसऱ्या टप्प्या पर्यंत आणि सुधीर पहिल्या टप्प्या पर्यंत पोहचले होते . आणि प्रविण संजय चे मनोधैर्य वाढवण्यासाठी तिसऱ्या टप्यावर आरूढ झाला होता . आता मात्र बाकी टीम पाठीमागील रस्त्याने अंगठ्यावर पोहचण्यास अधीर झाली होती , इकडे संजय चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या दिशेने विजयी मुद्रेणे सरसावत होता , आणि पश्चिमेला सूर्य विजयाचा गुलाल उधळण्याच्या तयारीत उभा होता .  अनेक अवघड टप्पे पार करत वर आलेला संजय तुलनेने सोप्या असलेल्या मार्गावर भर-भर चढाई करत होता . आणि काही क्षणातच संजय महाराष्ट्रातील तीन नंबरच्या अवघड समजल्या जाणाऱ्या नानाच्या अंगठ्या च्या माथ्यावर विराजमान झाला . आनंदाला उधाण आले जय भवानी ! जय शिवाजी ! च्या रणभेदी गर्जनांनी पुन्हा एकदा  परिसर दणाणून सोडला आणि आजच्या दिवसाची ही अविस्मरणीय चढाई जीवधन वर उभ्या असलेल्या वणारलिंगी अर्थात खडा पारशी सह सह्याद्रीतील अनेक सुळक्यानी याची देही याची डोळा अनुभवली .
इकडे आजच्या चढाईत बिलेयर ची महत्व पूर्ण भूमिका बाजावलेला प्रविण दादा पवार सुद्धा माथ्यावर पोहचला होता , त्या पाठोपाठ अजिंक्य उनवने , सुधीर गायकवाड , तन्वीर गायकवाड हे ही झुमरिंग करत विजयी मैदानात पोहचले . आजच्या या मोहिमेचे लीडर होते “ शिखर फाऊंडेशन ” चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर  आणि या मोहिमे मध्ये प्रविण पवार , संजय भाटे, सुधीर गायकवाड , तन्वीर गायकवाड आणि राजेश शर्मा हे सामील झाले होते . पुन्हा एकदा सर्वांनी शिवरायांचा जय घोष करत वाईंडप ला सुरुवात केली .
आजच्या  मोहिमेचे सर्व श्रेय टीम शिखर ला देत , अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांनी स्की या  संस्थेचे आभार मानत आनंद व्यक्त केला . आणि ऐका खूप मोठया चढाईचा थरार आणि आनंद डोळ्यात साठवत टीम परतीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

       शिवाजी आंधळे
भ्रमणध्वनी : ९८५०५५५९५३
shivaandhale.75@gmail.com

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Feb 11, 2015

No Comments

Leave a Reply