Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

Loading Events

« All Events

  • This event has passed.

Basic Adventure Course

December 24, 2017 - December 27, 2017

| Rs.2000

शिखर फाऊंडेशन आयोजित बेसिक अडव्हेंचर कोर्स

थोडक्यात ..........

पिंपरी आणि पुणे परिसरातील काही हौसी ट्रेकर्स ने एकत्र येऊन 2008 साली “ शिखर फाऊंडेशन ” नामक संस्थेची  स्थापना केली . उद्देश हाच होता की ; महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या भ्रमंती बरोबरच सह्याद्रीतील आणि हिमालयातील शिखरे सर करणे . तसेच गडकिल्यांच्या संवर्धना बरोबरीने साफसफाई , वृक्षारोपण अशी  सामाजिक कामे करणे .

मागील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेच्या गिर्यारोहकांनी  सह्याद्रीतील वासोटा , सांदनव्हली , भातराशी , लिंगाणा , आलंग - मलंग - कुलंग , कळसूबाई , हरिश्चंद्रगड , ए एम के असे अनेक ट्रेक यशस्विरित्या सुरक्षित पार पाडले आहेत . त्याच बरोबरीने कोकणकडा , भैरवगड , वजीर , खडापारशी , नानाचा अंगठा , बाण , सिद्धीची लिंगी अशा अनेक सुळक्यावर “ शिखर ” च्या गिर्यारोहकांनी दिमाखात भगवा फडकवला आहे . हिमालयात हि सतोपंत , भ्रुगूपंथ ,  हेमकुंड साहिब - व्हॅली ऑफ फ्लोअर , स्टोक कांगारी नचिकेत ताल , सप्तताल , अशा अनेक मोहिमा यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत .  वज्रगडावरील पाण्याच्या  टाक्यांची साफसफाई , कोंढेश्वर  , राजगड येथे वृक्षारोपन अशी अनेक सामाजिक कामे हि मंडळा ने केली आहेत .

हे सर्व करत असताना ; गिर्यारोहणा सारख्या साहसी खेळामध्ये  नवनवीन गिर्यारोहक तयार व्हावेत आणि त्यांच्या मध्ये प्रचंड साहस निर्माण व्हावे या एकमेव उद्देशाने “ शिखर फाऊंडेशन ” ने 2010 पासून बेसीक अडव्हेंचर कोर्स घेण्यास सुरुवात केली . यामध्ये आता पर्यंत 500 ते 550  प्रशिक्षणर्थी नी प्रशिक्षण पूर्ण केले आहे . या मधील काही जण मंडळाचे आघाडीचे गिर्यारोहक म्हणून नावारूपाला आले आहेत . तसेच काही जण नियमित पणे विविध मोहिमा मध्ये सक्रियपणे सहभागी होतात . हे सर्व करत असताना मंडळ सुरक्षेला प्रचंड महत्व देते . म्हणूनच मंडळाची स्थापना झाल्यापासून आज तागायत पर्यंत शून्य अपघात हे उद्दिष्ट साध्य झालेले आहे .

बेसीक अडव्हेंचर कोर्स मध्ये प्रामुख्याने खालील प्रशिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे .

डू अँड डोंन्ट .                            ◆ रिव्हर क्रॉसिंग .

माउंटन मॅनर्स .                          ◆ व्हॅली क्रॉसिंग .

फास्ट ऍड अँड सेफ्टी .               ◆ स्नेक अव्हरनेस प्रोग्रॅम .

टेंन्ट पिचिंग .                             ◆ बॅग पॅकिंग .

कक्लाईंम्बिंग टेक्निक .               ◆ योगा .

झुमरिंग टेक्निक .                       ◆ लिफ्टिंग टेक्निक  .

रॅपलिंग .                                   ◆ बुश क्राफ्टिंग .

                                                                           आणि भरपूर काही ................

तर येतायना मग नाताळ च्या सुट्टीत कोंढेश्वरला !

आपण ऑनलाईन अर्ज भरून आपला प्रवेश नक्की करा . त्या साठी खलील लिंक वर क्लिक करा .

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScyp7YHyGb6L6ICLvQwTgdLPW-0c5Mgf371OpyON62YhJGuug/viewform?c=0&w=1&usp=mail_form_link

IMG_2142

 

Details

Start:
December 24, 2017
End:
December 27, 2017
Cost:
Rs.2000
Event Category:
Website:
http://shikharfoundationpune.com/

Organizer

Vikrant Shinde
Phone:
7378986060

Venue

Kondeshwar
Kondeshwar
Pune, Maharashtra 411037 India
+ Google Map