Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

  • img_2032
  • _mg_3741
  • img_2142
  • img_3666
  • img_3592
  • edit_mg_5604
img_2032_mg_3741img_2142img_3666img_3592edit_mg_5604
Basic Adventure Course – Kondeshwar 2015

शिखर फाऊंडेशन कडून साहसी शिबिराचे यशस्वी आयोजन
कामशेतच्या आग्नेयला साधारणत: २५ कि.मी. अंतरावर शिवसह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आणि निसर्गाचा वरद हस्त लाभलेल्या शिवभूमी कोंढेश्वर येथे नाताळ च्या सुट्टीचा मेळ साधत दिनांक २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०१५ या चार दिवसाच्या कालावधी मध्ये “शिखर फाऊंडेशन" या गिर्यारोही संस्थेने बारा वर्षा पुढील मुलांसाठी सहासी शिबिराचे भव्य आयोजन केले होते.

शाळा-कॉलेज , नको त्या वयात लावलेले कोचिंग क्लासेस , आणि पालकांच्या प्रचंड अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या ; आणि उरलेल्या वेळेत व्हाट्सऍप , फेसबुक , गेमिंग झोन , अर्थहीन रक्तरंजीत भडक सिरियल च्या विळख्यात अडकलेल्या मुलांमध्ये साहसी वृत्ती निर्माण होऊन ; त्यांचे कोमेजलेले आयुष्य फुलावे, अंगी शिवसह्याद्री सारखा बळकट आणि दणकट पणा निर्माण होऊन त्यांचे आयुष्य आरोग्य दायी व्हावे हा एकमेव हेतू मनामध्ये ठेऊन , प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात हे शिबीर आयोजित केले होते .
दिनांक २४ डिसेंबर रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील ७६ मुलांना घेऊन बस भल्या पाहाटे हुडहुडी भरणाऱ्या थंडीत सह्याद्रीत सर्वदूर पसरलेल्या धुक्याची चादर दूर करत नाणे मावळ मधील जाभंवली गावाच्या पश्चिमेला असलेल्या ऐतिहासिक कोंढेश्वर मंदिराच्या दिशेने झेपावली , मंदिराच्या परिसरात मुलांचे आगमन झाल्यानंतर “शिखर फाऊंडेशन" चे अध्यक्ष श्री . विवेकानंद तापकीर आणि प्रशिक्षक प्रवीण पवार व शिवाजी आंधळे यांनी त्यांचे स्वागत केले . त्या नंतर भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूच्या जंगलामध्ये “शिखर फाऊंडेशन" च्या स्वयंसेवकांनी तयार केलेल्या कँप साईडवर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील नगरसेवक व मनसे चे पालिकेतील गट नेते मा. आनंत भाऊ कोराळे यांच्या शुभ हास्ते वृक्षारोपन करून आगळ्या - वेगळ्या पद्धतीने सहासी शिबिराचे उद्घाटन केले , या वेळी कोराळे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत पुढील वर्षी शिबिरात सहभागी होण्याचे आश्वासन देत सर्वांना शुभेच्छा दिल्या .
पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये ओळख परेड नंतर प्रथम जालिंदर वाघोले यांनी परिसराची माहिती देत ‘ डुज ऍण्ड डोंट ' चे लेक्चर घेतले . त्या नंतर शिवाजी आंधळे यांनी ‘ माउंटन मॅनर्स ' या विषया वरती व्याख्यान दिले . आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये विशेष आकर्षण असलेला ‘ स्नेक आव्हरनेस प्रोग्राम ' पुणे जिल्हा वन्यजीव संरक्षण सोसायटीचे सुरेश ससार आणि अजिंक्य उनवने व त्यांचा सहकार्यानी पोस्टर च्या माध्यमातून उलगडला . या मध्ये सह्याद्रीच्या जंगलात ट्रॅकिंग ला गेल्या नंतर आढळणारे साप , त्यांची गुण वैशिष्ट्य , विषारी , निमविषारी आणि बिनविषरी जाती कोणत्या त्यांचे शास्त्रीय फायदे तोटे इ. सह दंश झाल्या नंतर करावयाचे प्रथोमपचार व सर्पा विषयीचे समज - गैरसमज आणि बरेच काही अजिंक्य उनवने यांनी विनोदी शैलीतून मुलांसमोर मांडले .
रात्री आकाश दर्शन च्या प्रोग्राम मध्ये विविध ग्रह तारे आणि त्यांचे कॉन्सिंलेशन या बद्दल विस्तृत पणे माहिती देण्यात आली .
दिनांक २५ डिसेंबर च्या सकाळच्या सत्रा मध्ये शारीरीक कवायती नंतर मुलांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण व्हावी व प्रशिक्षण देण्यामध्ये सुसूत्रता यावी या हेतूने २५-२५ मुलांचे तीन गट तयार केले.
त्या नंतर रॉक क्लाइंबिंग साठी आवश्यक असलेल्या रोप नॉटस् चे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक विवेकानंद तापकीर यांनी घेतले .
दुपारच्या सत्रा मध्ये खऱ्या अर्थाने सहासी प्रशिक्षणास सुरुवात झाली , एक गट रिव्हर क्रॉसिंग टेक्निक , दुसरा गट बोल्डरिंग व बिले टेक्निक आणि तिसरा गट रॉक क्लाइंबिंग व रॅपलिंग साठी च्या प्रशिक्षणा साठी कॅम्प साईड पासून जवळच असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले . या साठी तिन्ही ग्रुपला वेगवेगळे तीन प्रशिक्षक व साहयक गट असी रचना होती .
संध्याकाळच्या सत्रा मध्ये संगीत खुर्ची सह विविध प्रकारच्या खेळा सह धमाल उडवत तिन्ही गटानं मध्ये कुकिंग कॉम्पेंटेशन घेतली, या मध्ये उद्देश हा होता की ट्रॅकिंग ला गेल्या नंतर स्वयंपाक कसा बनवावा अथवा त्याची तयारी कसी करावी , या मध्ये दगडाची चूल बनवण्या पासून ते ज्वलना साठी चे लागणारे लाकूड जंगलातून आणण्या पर्यंतची सर्व कामे मुलांनी केली .
दिनांक २६ डिसेंबर कवायती नंतर मुलांना अँक्टीव्हिटी साठी पॅच वर पाठवले. रिव्हर क्रॉसिंग टेक्निक मध्ये रोप च्या साह्याने चार प्रकाराने नदी ओलंडण्याचं तंत्र शिकवले या मध्ये सिंगल रोप विथ बॅलन्स , डब्बल रोप , मंकी क्रॅव्हलिंग , कमांडो टेक्निक . त्यानंतर खूप मोठया रॉक पॅच वर थ्री पॉईंट होल्ड तंत्रझाना सोबतच बिले ड्रिल्स , झुमरिंग , रॅपलिंग सह क्लाइंबिंग मधील अनेक बारकावे समजवत प्रात्यक्षिका सह करून घेतले .
दुपारच्या सत्रा मध्ये डाँ . डोईफोडे यांनी प्रथोमपचार या विषया वरती सखोल असे मार्गदर्शन केले . रात्री कॅम्पफायर चे आयोजन करून मुलांना गायक प्रशांत पवार व राजेंद्र किर्वे यांच्या संगीत आर्केसट्रा च्या तालावर थिरकावयाला लावले . धमाल , मस्ती , मजा करत जंगला मध्ये अवतरलेल्या सांताक्लॉज च्या चॉकलेट वर डल्ला मारला .
वाढदिवस म्हटले कि मुलांचा आनंदाचा क्षण ,आणि वाढदिवस साजरा झाला नाही तर मुले प्रचंड नाराज होतात पण हि ही उणीव भरून काढता कॅम्प मध्ये दाखल झालेल्या तीन मुलांचे वाढदिवस प्रशांत पवार यांच्या ठेक्यावर केक कापून साजरे केले त्या मुळे सर्वांन मध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले .
२७ डिसेंबर आजचा शेवटचा दिवस , आज घरी जायला लागणार ; पुन्हा तोच अभ्यास तेच ते रटाळवाने रुटीन याची चिंता मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होती अथवा तशी ते व्यक्त करत होते .
सकाळच्या सत्रामध्ये रोप वरून पुल्लीच्या साह्याने व्हॅली क्रॉसिंग चा थरार अनुभवत एकमेकास प्रोत्साहित केले .
शेवटी सर्वांची एक लेखी परीक्षा घेऊन फीडबॅक फॉर्म भरून घेतले त्यांनी दिलेल्या सूचनांचा आदर करत , पुढील वर्षी अमलबजावणी करण्याचे आश्वासन देत पुढील कार्यक्रमाकडे वळण्याचे ठरले.
चार दिवसाच्या आनंद यात्रेच्या समारोप प्रसंगा साठी टाटा मोटर्स कार विभागाचे उत्पादन प्रमुख श्री . हेमंत बर्गे उपस्थित राहिले त्या अगोदर त्यांनी कॅम्प साईड सह प्रात्यकक्षीक पॅच ची पाहणी करत सर्व उपक्रमाची माहिती करून घेतली .
मुख्य कार्यक्रमामध्ये शिवप्रतिमा देऊन विवेकानंद तापकीर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले , त्या नंतर प्रशिक्षणार्थी नी आपले अनुभव कथन केले , तसेच पाहुण्यांच्या हस्ते बेस्ट प्रशिक्षणार्थी चा सन्मान करत सर्वांना प्रमानपत्रांचे वितरण केले .
समारोपाच्या प्रसंगी श्री . हेमंत बर्गे यांनी मुलांसह त्यांच्या पालकांचे आभार मानत “ शिखर फाऊंडेशन ” च्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले आणि टाटा मोटर्स अशा उपक्रमामध्ये सदैव आपल्या बरोबर राहील असे आश्वासन देत मुलांना या प्रशिक्षणाचा भविष्यात निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी आंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण पवार यांनी केले .
या शिबिरासाठी स्वयंसेवक व प्रशिक्षक म्हनुण विवेकानंद तापकीर , प्रवीण पवार , संजय भाटे , जालिंदर वाघोले , शिवाजी आंधळे , राजेश चिंचवडे , सुधीर गायकवाड , नितीन टाव्हरे , सुनिल देवकर , अजित भोसले , भास्कर मोरे , सुरेश सासार , आणि मुलांचे आनंदी क्षण टिपण्याचे काम सागर मते , संदीप भरेकर , नितीन बेल्हेकर , गुलाब जरांडे यांनी केले . तर महिला स्वयंसेवक म्हणून
सौ. प्रिती पवार , सौ. गायकवाड , सौ. भरेकर , सौ. सारिका वाघोले , सौ. आशा आंधळे यांनी काम पाहिले.
शिबिरामध्ये राहण्याची सोय टेंन्ट ( तंबू ) मध्ये केली होती . जेवण , चहा , नाष्टा ची सोय कॅम्प साईडवरच केली होती .
शिबिरासाठी पसाठी टाटा मोटर्स व जांभवली ग्रामस्थाचें विशेष सहकार्य लाभले .
या वेळच्या कोर्स चे विशेष आकर्षण म्हणजे मुलींसाठी टॉयलेट टेंन्ट ची व्यवसस्था केली होती .

शिवाजी आंधळे
मो. नं . ९८५०५५५९५३
shivaandhale.75@gmail.com

Posted In:

Other Details
  • Submitted On : 04 Apr 2016