Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

मढे घाट

“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी मुळे मोटारसायकल एक्सपेडिशन चे मोटार एक्सपेडिशन मध्ये कधी रूपांतर झाले ते काळलेच नाही .

shikhar foundation , chinchwad
shikhar foundation , chinchwad

चार टाटा नॅनो , एक टाटा झेस्ट , एक टाटा मांझा , आणि एक i 20 आणि दहा बुलेट च्या मदतीने सत्तेचाळीस उत्साही ट्रेकर्स नी सकाळी सात वाजता शिखर ऑफिस पासून प्रस्थान ठेवले . राजकीय पक्षाच्या रॅली ला लाजवेल आशा थाटात सर्व जथ्था पुणे - बेंगलोर हायवे वरून पुढे सिंहगड रोड ने जाऊन खडकवासला धरणाच्या चौपाटीवर थांबला . प्रवीण दादा , राजेश चिंचवडे सह पुण्यातून येणारी मंडळी रॅलीत सहभागी झाली .
धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे मुख दर्शन घेऊन गाड्यांची रांग पाबे घाटाच्या चढणीला लागली . गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत आणि सतत कोसळणाऱ्या आषाढ सरी अंगावर झेलत आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी उडवत रॅली पाबे घाटाच्या पायथ्याला थांबली . आषाढ सरी अंगावर झेलत आणि गवताच्या गालिच्यावर साठलेले पाण्याचे टपोरे थेंब पायाने उडवत पावसाचा आनंद लुटला . सिंहगडा च्या तान्हाजी कड्यावरून कोसळणाऱ्या अवखळ धबधब्याचे आणि हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगर रंगाचे आणि रंगी बेरंगी पोशाखत अंग लपेटून घेतलेल्या ट्रेकर्स चे छायाचित्रण गुलाबराव जारांडे च्या कॅमेऱ्या मध्ये कैद करत सर्व जण पाबे घाटाच्या दिशेने रवाना झाले . पाबे घाटाच्या खिंडीत पुन्हा एकदा थांबा घेत नव्या पिढीच्या सेल्फी वर फिदा होत पाबे घाटातून दिसणाऱ्या गुंजवणी खोऱ्यातील तुडुंब भरलेल्या भात खाचराच्या आणि हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगांच्या पार्शवभूमीवर सेल्फी चा मनमुराद आनंद लुटला .
pabe ghat , shinhgad fort , panshet
pabe ghat , shinhgad fort , panshet

pabe ghat , shinhgad fort , panshet
pabe ghat , shinhgad fort , panshet

पुढे उताराची वळणे घेत तोरणा गडा च्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा मधील हॉटेल स्वप्नील मध्ये ,काल रात्री पासून अन्नाचा एक कण ही न गेलेल्या पोटाला ठसकेबाज मिसळ ने आधार देण्याचे काम केले . गरमा गरम भजी , सँपल मारके मिसळ , वाफळलेला चाहा आणि वेटर च्या राजकीय संवाद फेकीने तृप्त झालेल्या अवघ्या जनांनी आमचे शिखर चे सहकारी संतोष झेंडे यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत मढे घाटाच्या दिशेने कूच केली . चापेट धरणा च्या उजव्या बाजूने नागमोडी वळणे घेत , रस्त्यात भेटलेल्या धबधब्या मध्ये भिजत तरी कधी पावसाच्या सरी अंगावर झेलत , तर मध्येच सैराट मधील आर्ची आणि पारशा च्या डायलॉग ची पेरणी करत सर्व उत्साही ट्रेकर्स धुक्यात लपलेल्या मढे घाटाच्या पठारावर पोहचले .
धुक्यात हरवलेला लक्ष्मी धबधबा आणि कोकणचा जलमय भूप्रदेश दिसतच नव्हता . वाऱ्यामुळे धबधब्यातून उडणारे तुषार अंगावर झेलत दुधाची ताहान ताकावर भागवली , पण शिवाजी ने खिंडीतून खाली उतरणाऱ्या रस्त्याची चाचपणी केली आणि सर्वांना खाली घेऊन जाण्याची तयारी केली . ४ फेब्रुवारी १६७० च्या कोंढण्याच्या लढाई मध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे धारातिर्थि पडले तेव्हा त्यांचे पार्थीव याच वाटेने त्यांच्या मूळ गावी म्हणजे पोलादपूर जवळील उमरठे या गावी नेण्यात आले होते म्हणून या वाटेला मढे घाट नाव पडले आहे .
Laxmi water fall , vhelha , torna fort
Laxmi water fall , vhelha , torna fort

Laxmi water fall , vhelha , torna fort
Laxmi water fall , vhelha , torna fort

pabe ghat , shinhgad fort , panshet ,Laxmi water fall , vhelha , torna fort
pabe ghat , shinhgad fort , panshet ,Laxmi water fall , vhelha , torna fort

प्रवीण सरांनी खाली उतरण्या संबधी सूचना दिल्या , तर शिवाजी आंधळे यांनी पुन्हा एकदा शिव काळा मध्ये घेऊन जात शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला . पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व जण सुरक्षित खाली गेले तेव्हा निसर्गाला ही लाजल्या सारखे वाटले आणि संपूर्ण सह्याद्री वरचे धुक्याचे मळभ हटले . २५० ते ३०० फुटावरून कोसळणाऱ्या लक्ष्मी धबधब्या खाली चिंब होऊन भिजण्याचा आनंद लुटत सर्वांनी धमाल केली . आनंद लुटताना भान ही राखले पाहिजे या हेतूने प्रविण दादा नी सर्वांना वर येण्याची सूचना केली . वर येऊन पठारावरून दिसणाऱ्या कोकणचे आणि सह्याद्रीचे शृंगारीक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत परतीचा मार्ग धरला . पुढे गावा मधील एका घराच्या पावसाळी वातावरणामध्ये धुंद झालेल्या पडवीत घरीहून घेतलेल्या जेवणावरती येथेच्छ ताव मारला . आणि फणसाचे गरे तोंडात चघळत तुफानी पावसातच पुण्याचा रस्ता धरला .

शिवाजी आंधळे

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Jul 12, 2016

No Comments

Leave a Reply