Any Questions? Call Us: 7276186618 / 9822599708

देवभूमी हिमाचल

एक कोटी सत्तर लाख वर्षा पूर्वी ; गोंडवन अर्थात भारतीय द्वीपकल्प आणि युरोशिया यांच्या मध्ये असलेल्या टेथिस नावाच्या समुद्र तळाशी भूगर्भा मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होऊन ; टेथिस समुद्राने आपले अस्तित्व मिटवून घेत ; पोटामध्ये साठलेल्या प्रचंड गाळा पासून आणि दगड वाळू पासून एका प्रचंड माहाकाय पर्वत रांगेची निर्मिती झाली . तोच हा भारताच्या उत्तरेला दिमाखात युगे न् युगे उभा असलेला ; भारताचा ताज म्हणून ओळखला जाणारा , आणि आपल्या अस्तित्वाने भारताचा इतिहास च नव्हे तर भूगोल ही बदलण्याचे सामर्थ्य ठेवणारा पर्वत राज “हिमालय”.
आशिया खंडात पसरलेली सर्वात उंच डोंगर रांग म्हणून ही हिमालयाकडे पाहिले जाते . हिमालय पर्वतरांग भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० किमी पेक्षाही जास्त आहे. ती भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते. हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्याच प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पावसाची कृपा आहे तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाउन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार रहाण्यास मदत होते. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत पाकिस्तान बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटी हून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यामुळेच जगातील सर्वांत महत्त्वाच्या पर्वत रांगांमध्ये हिमालयाचा समावेश होतो. हिमालयाची उंची व भव्यता यामुळे प्राचीन कालापासून हिमालय भारतीयांना आकर्षित करत आला आहे. हिमालयाची अनेक वर्णने वेदांमध्ये आढळतात व त्याच्या स्तुतिपर अनेक रचना लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात हिमालयाला देवासमान स्थान आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे स्वर्गाला जाण्याचा मार्ग हिमालयातून जातो म्हणून पांडवांनी शेवटची यात्रा हिमालयात केली. हिमालयाला देवांचे वस्ती-स्थान म्हणून मानण्यात येते. कैलास पर्वतावर शिव आणि पार्वती निवास करतात असा समज आहे. मानस सरोवर व ॐ पर्वत हिंदूसाठी अतिशय पवित्र स्थळे आहेत. हिमालयातील उगम पावलेल्या नद्यांच्या काठांवर प्राचीन भारतीय संस्कृती विकसित झाली त्यामुळे देखील हिमालयाला आदरयुक्त स्थान आहे. अमरनाथ, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ तसेच नेपाळ मधील अनेक स्थळे हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहेत. दरवर्षी हजारो लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणांना भेट देण्यास जातात. बौद्ध धर्मीयांमध्येही हिमालयाला अनोखे महत्त्व आहे. हिंदू धर्मीयांप्रमाणेच तेही कैलास पर्वताला पवित्र मानतात. आशा अनेक वैशिष्टयानी आणि गुणांनी ओतपोत भरलेल्या , आणि अखंड मानव जातीचे हित , कल्याण चिंतिणाऱ्या अनेक साधू संता पासून ते अनेक दुर्मिळ वन्य जिवांचे वस्ती स्थान असलेल्या व भूतलावरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालयाला डोळ्यात साठवण्याचा योग गिर्यारोहण क्षेत्रा मध्ये आघाडीवर असलेल्या “ शिखर फाऊंडेशन ” या संस्थेच्या नियोजना मुळे घडून आला .
कर्म आणि कर्तव्याच्या चक्रव्हूव मध्ये अडकलेला मी ; पण माझ्या आत लपलेल्या गिर्यारोहकाला जागे करण्याचे कसब वापरून “शिखर” चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर , जालिंदर वाघोले आणि टीम ने मला “स्वर्ग से सुंदर” धरती डोळ्याच्या पटलावर कोरण्याची संधी प्राप्त करून दिली . जरा आढे वेढे घेतच मी तयार झालो , कारण हिमालय म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो फोटो मध्ये न मावणारा थंडगार बेधुंद निसर्ग . पण त्याच बरोबरीने क्षणात मूड बदलून होत्याचे नव्हते करणारा प्रकोपी हिमालय . म्हणुन थोडी भीती माझ्या ही मनात होतीच . पण निसर्ग ही खुणावत होताच , भितीवर निसर्ग प्रेमा ने मात केली . आणि एक प्रश्न मिटला . तोच दुसरा प्रश्न उभा होताच ; माझ्या तब्यतीच्या काळजीने म्हणा , की पंधरा दिवसाच्या विरहा मुळे म्हणा . पण आमच्या सौ चा मुड मात्र पुर्ण ऑफ झाला होता . नेहमी प्रमाणे थोडी मिनतवारी केल्या नंतर सौभाग्यवती तयार झाल्या आणि आमचं विमान लोहगाव विमानतळावर जाण्या आगोदरच टेकअप झाल .पुन्हा जमिनीवर येत “ शिखर ” ची बरोबर घ्यावयाच्या सामानाची यादी हातात पडली होती , तिच्यावर नजर टाकत तयारीला लागलो . आवश्यक सामानाची जुळवा जुळव करून ; काही आवश्यक खरेदी केली , पण ट्रेकर्स च एक बर असत ; “ ऐक मेका साह्य करू । अवघेची धरू सुपंथ ॥ या अभंगा नुसार काही वस्तू परत करण्याच्या अटीवर पण मिळाल्या .
हिमालय म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो जम्मू-काश्मीर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , सिक्कीम चा मनाला वेड लावणारा बेधुंद निसर्ग आणि ट्रेकर्स ला खुणावत असतात आकाशाला गवसणी घालणारी हिमच्छादीत शिखरे , शिखरांना हुलकावनी देणाऱ्या पाय वाटा ( ट्रेकिंग रूटस् ). आणि आशाच एका पाय वाटणे जाण्याचे नियोजन केले होते ; “ शिखर फाऊंडेशन ” च्या टीमने . ही पाय वाट होती , हिमाचल प्रदेशातील रेकाँगपिओ शहराच्या पूर्वेला पाच कैलासा पैकी एक असलेल्या “ किन्नोर कैलास ” परिक्रमेची . अतिशय अवघड आणि ट्रेकर्स च्या तंदुरुस्ती ची कसोटी पाहणारा हा ट्रेक असलेल्या मुळे टीम मेंबर्स ची निवड ही अगदी त्याच कसोटी वर करण्यात आली , त्या साठी सहयाद्री मध्ये अनेक सराव मोहिमा राबवून तयारी करून घेण्यात आली होती . सर्व कसोट्यावर पात्र ठरत ; सात वीर या मोहिमे वर जाण्यास सज्ज झाले . या मध्ये प्रमुख्याने मोहिमे ची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती ते “ शिखर फाऊंडेशन ” चे अध्यक्ष विवेकानंद तापकीर , अनेक हिमालयीन मोहिमेचा अनुभव पाठीशी असणारे जालिंदर वाघोले , राजेश चिंचवडे , सह्याद्री मधील अनेक सुळक्यांवर चित्तथरारक चढाया करणारे संजय भाटे त्याच प्रमाणे अनेक साह्य वाटांची धूळ मस्तकी लावत भटकंती करणारे शिवाजी आंधळे , भास्कर मोरे आणि दिगंबर सुरजूसे .

SHIVAJI , VIVEK , JALINDAR , BHASKAR, RAJESH, DIGAMBAR
SHIVAJI , VIVEK , JALINDAR , BHASKAR, RAJESH, DIGAMBAR

निघण्यास फार कमी दिवस शिल्लक असल्यामुळे प्रत्येकाची लगीन घाई सुरु होती , खरेदी आणि इतर कामाचे नियोजन करत असतानाच, हा हा म्हणता निघण्याचा दिवस उजडला . आणि सर्व टीम मार्गस्थ होण्यास सज्ज झाली .अंगातून घामाच्या धारा काढणारी २९ एप्रिल ची उष्ण संध्याकाळ . आपल्या ठासून भरलेल्या बॅग ला पाठीवर घट्ट बांधून , हिमालयाच्या भेटीसाठी अतुर झालेले सात साह्य वेडे मावळे निघण्यास सज्ज झाले होते .IMG_20160429_215132
नगरसेवक आनंत कोऱ्हाळे , मंडळाचे अनुभवी गिर्यारोहक आणि सर्वांचे मार्गदर्शक प्रवीणदादा पवार , नितीन टाव्हरे , राहुल भिरंगी , अजित भोसले , प्रशांत पवार , सुनील देवकर आणि इतर सर्व शिखर चे सदस्य आणि कुटुंबिया सह सर्वांनी गळा भेट घेत दिलेल्या शुभेच्छा , हार तुरे आणि काळजी घ्या ! या शब्दातून जाणवणाऱ्या आपुलकी मुळे सर्वांचे दाटून आलेले कंठ , आणि यामुळे काही क्षण भावनिक झालेल्या वातावरणातच हालणाऱ्या हाताबरोबरच हॅपी जर्नी ! हे शब्द उमटले , आणि सात वेडे वीर वाऱ्याच्या वेगाने वाऱ्यावर स्वार होण्यास लोहगाव विमानतळाकडे झेपावले .
विमानतळा वरील सोपस्कार उरकत असताना ; आमच्या कडील ट्रेकिंग इक्विपमेंट आणि बॅग पाहून कर्मचार्याकडून होत असलेली विचारणा आणि त्या बरोबरच होणारे कौतुक पाहून मी अगदीच भारावलो . कारण माझा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे मनामध्ये हूर - हूर आणि थोडी भीती ही होतीच . पण झाले असे की ; कर्मचार्याच्या कौतुकाने माझी भिती कुठची कुठे पळून गेली आणि खास व्यक्तीचे महत्व प्राप्त झाले . कारण एरव्ही आपल्याला टम टम च्या रिक्षा स्टँड वर सुद्धा कोणी रिक्षात बसण्याचं अगत्य करत नाही . पण आज मात्र “ गिर्यारोहना ” मुळे विमानतळावर मान उंचवली होती . एका गोड सुमधुर आवाजात विमानाची उद् घोषणा झाली . आम्ही सरकत्या जिन्यावरून उतरत भल्यामोठ्या विमानाशेजारी उभ्या असलेल्या जिन्यातुन वर जात विमानात प्रवेश केला, आणि रामोजी फिल्म सिटीतील न उडणाऱ्या विमानात बसल्या पासून च्या , ते आज खऱ्या खुऱ्या विमानात बसण्या पर्यंतच्या दहा वर्षाच्या ऐतिहासिक कुतुहलाला पूर्ण विराम मिळाला . अन् कोण काय म्हणेल , याचा फार विचार न करता ; आणि सेल्फी वेड्या मनाला आवर न घालता , खचाक् .... खचाक् ... करत दोन चार सेल्फी काढून घेतल्या आणि मोबाइल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जाण्याच्या आगोदर बायकोला पाठवून दिल्या . आता मात्र मी विमानाची आंत:बाजू न्याहळत हवाईपरी , माफ करा ! हावाईसुंदरी ने दिलेल्या सूचनांचा आदर करत आंमलबजावणी करत होतो . कमरेचा पट्टा करकचून आवळत शिट सरळ केली, आणि खिडकीच्या बाहेर धाव पट्टीवरील लुकलुकणाऱ्या दिव्याकडे सावध मनाने पाहत हाताच्या मुठ्ठी शिट वर घट्ट आवळल्या . तो पर्यंत विमानाने मुख्य धाव पट्टी वर येत जोरात आवाज करत धाव घेतली आणि काही क्षणातच विमान हावेत झेपावले . लहान पणी ढगांच्या आड विमान शोधताना पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झाले . दिवसा गर्दी मुळे नकोसे वाटणारे रस्ते लाईट्स मुळे अगदी आखीव रेखीव आणि सुंदर वाटत होते , त्या वरून धावणाऱ्या गाड्यांच्या लाईट्स मन मोहित करत होत्या , आता मात्र संपूर्ण शहर एखाद्या रांगोळी सारख भासत होते , किती हा अनुपम आणि विलक्षण नजारा डोळ्याला सुखावत होता . जीव गुदमरून टाकणारे शहर आता किती निरव आणि शांत वाटत होते , ना गोंगाट ना गर्दी फक्त नयन रम्य रोषणाई . लाईट्स आता मंद होत दूर जात होत्या आणि मधून च एखादी पुसटशी रांगोळी मन मोहित करत होती . खिडकीवर लख्ख प्रकाश पडला होता म्हणून मान वर करून पहिले तर ; काय नवल ! चंद्र खिडकीच्या शेजारी अगदी समोर दिसत होता , सुंदर , शितल आणि तितकेच तेजस्वी दिसणारे चंद्राचे रूप पाहून , मनाला वाटले , प्रियकर प्रियसीला चंद्र तारे आणून देण्याच्या गुजगोष्टी कानात का बरे करत असेल ? आणि याचा उलगडा मला आज झाला . कारण या पेक्षा सुंदर गोष्ट दुसरी असूच शकत नाही . मी ही , माझी प्रियसी शेजारी असती तर ; ओह.... स्वारी ! बायको शेजारी असती तर तिला सुद्धा म्हटले असते “ एव्हडे दिवस कधी जमलं नाही , आलो आहे वर तर देऊ का तुला हा चंद्र ! ” (लग्न झाल्यानंतर मोठ मोठ्या वल्गना करून चालत नाही , म्हणून जरा बेतानेच )आणि नक्कीच प्रेमाला बहर आला असता . विमानाची दिशा बदलत असल्यामुळे चंद्र ही लपंडाव खेळत होता , किती अनुपम आणि अविस्मरणीय अनुभव होता .खरोखरच चंद्राच हे देखणं रुपड पाहून , माझा पहिला विमान प्रवास सार्थकी लागल्याच समाधान लाभल . रात्रीचे दोन वाजून गेले असताना सुद्धा झोप माझ्या डोळ्यांना स्पर्श करू शकली नव्हती, आणि मी वेडा अंधारात निसर्गाचा आनंद लुटत होतो.
आता हाळू हाळू विमानातील लाईट्स प्रकाशमान होऊ लागल्या , आणि रातरण्यांची (हावाईसुंदरी) लगभग जाणवू लागली , मी मनाला ताडले, आपण हा क्षण आता जास्त वेळ नाही अनुभवू शकत . आणि तेवढ्यात उद्घोषणा झाली , कुच्छ ही समय मैं अपना विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हावाई आड़े पे उतरणे वाला हैं ! मी सीट बेल्ट बांधून घेतला आणि पुन्हा एकदा श्वास रोखून खुर्ची घट्ट पकडली . काही वेळातच इंडिगो एअर लाईन्स चे विमान एक जोरात झटका मारत धावपट्टीवर उतरले . दोन तासाच्या प्रवासातील अंधाऱ्या रात्रीच्या सोनेरी आठवणी मानाच्या एका कोपऱ्यात साठवत, विमानातून बाहेर पडलो . आनंद आणि समाधानी चेहऱ्यानी सात नंबर च्या बेल्ट वर सामानाची वाट पाहत उभा राहिलो .
30 एप्रिल ची पहाट , विमानतळावरून बाहेर पडत सरळ टॅक्सी पकडून सराया रोहिला दिल्ली स्टेशन गाठले . गाडी सुटण्यास बराच वेळ असल्यामुळे पाहाटच्या अंधारातच स्टेशनवर थोडी पेट पूजा करून घेतली आणि थोडा आराम करत साडे पाच वाजता सुटणारी “ हिमालयीन क्वीन एक्स्प्रेस ” पकडली . गाडीत बसल्यानंतर थोडा अपेक्षा भंग झाला , कारण गाडी चेअर कार असल्या मुळे पाय लांबवून झोपण्यास जागा मिळाली नाही . झोप डोळ्यावर असल्यामुळे सर्व सहकारी गाडीच्या गती बरोबर काही क्षणातच डुलायला लागले , मी मात्र झोप येत असून सुद्धा नवखा प्रदेश न्याहळण्याच्या मूड मध्ये च होतो , पण झोप माझा पिच्छा सोडत नव्हती , मध्येच डुकली काढत पुन्हा जागा होत , खिडकीच्या बाहेरील विश्वात रमत होतो. पुन्हा मधूनच मानेला झटका देत होतो . गाडी ची गती कमी झाली , आणि मी मात्र स्टेशन चा बोर्ड शोधण्यात गुंग असताना सुमधुर आवाज कानी आला . आणि मला पहिल्या ओळीत एवढेच कळाले की हे स्टेशन “ सोनपत ” आहे . बस् नाव ऐकल्या बरोबर माझ्या डोळ्यावरची झोप ताडकन उडाली . आणि मोठा खोल श्वास घेत उठून उभा राहिलो . गाडी थांबता क्षणी खाली उतरून स्टेशन वरील भल्या मोठ्या प्लॅट फॉर्म वर नजर टाकली . पण सर्व स्टेशन असतात त्याच पद्धतीच हे ही एक स्टेशन होत , पण माझ्या साठी हे एक फक्त स्टेशन नसून ; मराठयांच्या पानिपत च्या लढाईचा थरार अनुभवलेल हे एक ऐतिहासिक क्षेत्र होत . डोळ्या समोर पानिपतचा रणसंग्राम उभा राहिला , तसा मी विश्वासराव पाटलांच्या पानिपत कादंबरीत घुसलो . गाडी च्या वेगा बरोबर माझं मन ही वेगाने इतिहासात घुसत होते . मराठे सोनपत च्या मुक्कामात कुठे थांबले असतील . कुठल्या मार्गाने पुढे गेले असतील असे एक ना अनेक वेडे प्रश्न मनाला हैराण करत होते . काही वेळातच वेगवान मनाच्या वेगाने गाडी ही पानिपत ला येऊन थांबली . हेच ते पंडुप्रस्थ अर्थात पानिपत . गाडी थांबताच खाली उतरून धीर गंभीर मनाने या रक्ताळलेल्या ऐतिहासिक भूमीला मनोभावे नमन केले . आरे कुठे शनिवारवाडा ! आणि कुठे पानिपत ! मराठयांनी आणि भीमेच्या तट्टा नी तुडवलेल आंतर पाहूनच अभिमानाने छाती ला तडे जावेत . पानिपत आणि पानिपतचा रणसंग्राम सोप काम नव्हतं ! नजर पोहचेल तिथपर्यंत सपाट विस्तीर्ण प्रदेश . सह्याद्रीच्या साथीने गनिमावर तुटून पडणारे मावळे कसे लढले असतील येथे , आणि ते ही उपाशी पोटी . काही इतिहासकार म्हणत ही असतील पानिपतावर मराठे हारले . पण नाही ! १५ जानेवारी १७६१ रोजी मराठयांनी घडवलेल्या शौर्यान आणि भाऊसाहेब, विश्वासराव , समशेरबहाद्दर , शिंदे , होळकर आणि असंख्य मराठयांच्या तलवारी ची आणि इब्राहीम गारद्याच्या तोफ गोळ्यांची धास्ती घेतलेल्या अहमद शाहा अब्दाली सारख्या गनिमानी पुन्हा या भूमीवर पाऊल ठेवण्याची हिम्मत केली नाही . आज ही नुसता विचार केला तरी अंगाचा थरकाप उडेल , अस् अतुलनीय शौर्य प्रत्येक मराठी सैनिकांनी या ठिकाणी केलं . सोप नव्हतं ! पण छत्रपती शिवरायांनी पेटवलेल्या स्फुलिंगाचा हा भडका होता , एव्हढच . मनावरील इतिहासाचे वलय हाटता हाटता नव्हते , गाडी ने वेग घेतला तसे माझे ही मन आसपासच्या प्रदेशात कालाआम , यमुनेचा तो ऐतिहासिक बांध , भाऊसाहेबांची , विश्वासरावांची समाधी , शोधण्यात भटकू लागले . इतिहासाच्या या जखमां नी मन अगदी खिन्न झाले होते , पण पानिपत सारखी शौर्य भूमी याची देही याची डोळा प्रवासाच्या निमित्ताने पाहण्याचा योग आला . हे नसे थोडके ! . सोनपत सोडल्या पासून मी पूर्ण इतिहास मय झालो होतो , पानिपत नंतर पुढे कुरुक्षेत्र , महाभारतातील हीच ती रणभूमी , याच ठिकाणी घडले महाभारत , याच ठिकाणी रुतला होता कर्णा चा रथ , याच ठिकाणी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने हाकला होता अर्जुनाचा रथ , याच ठिकाणी सांगितली गेली होती ; जगाला जगण्याचा आधार बनलेली भगवतगीता . किती हे महान तीर्थक्षेत्र . पुढे वाटेत भेटले ते अंबाला . अंबाला हि तसे भारतीयांच्या आणि विशेष माहाराष्ट्रीयन लोकांच्या परिचयाचे कारण ; माहात्मा गांधी ची हत्त्या करणारा पुण्याचा नथुराम गोडसे यांना याच ठिकाणी फाशी दिले गेले . सहज प्रश्न पडला, का चटावली असेल ही भूमी मराठयांच्या रक्ताला ? उत्तर फक्त या भूमीलाच माहित असावे . एकीकडे वाटेत भेटलेली ही गावे पाहण्याचा आनंद होताच , पण काळजा मध्ये खोल पर्यंत झालेल्या ऐतिहासिक जखमा ही होत्याच . खिन्न मनाने इतिहासाची पाने डोळ्यापुढून सरकत होती , तशी गाडी ही पुढे धावत होती . शांत आणि रम्य पण जाट आंदोलनाचे चटके लागलेले हरियाणा शहर मागे सोडत सकाळी ११ वा आम्ही हिमालयाचे प्रवेश द्वार समजल्या जाणाऱ्या कालका स्टेशन वर उतरलो . शिमला साठी जाणाऱ्या मिनी ट्रेन ची चौकशी केली असता , गाडी होती पण शिमला जाण्यासाठी खूप वेळ लागणार होता . साधारणतः साडेपाच ते सहा तास . ट्रेन चा विचार सोडून आम्ही बस ने जाण्याचा पर्याय निवडला . थेट शिमला जाणारी बस न मिळाल्यामुळे आम्ही सोलन पर्यंत जाणारी बस पकडली . बस मध्ये बसल्याबरोबर येथील वाहक आणि चालक यांचे आदरतिथ्य पाहून मी चकीतच झालो . कारण बऱ्याच वेळा रा प मा ( एस टी महामंडळ ) च्या कंडक्टर चे धक्के मी अनुभवले आहेत . सामान ठेवण्यास मदत , बसण्यासाठी जागा करून देणे , सुट्या पैशासाठी वाद न घालता, हां जी ! म्हणत आदरातिथ्य करत टिकिट हातात देणे . वा ! मी जाम खुश झालो . कालका सोडल्या नंतर लगेच “ देवभूमी हिमालया ” चे दर्शन झाले . सपाटी नंतर छोट्या टेकड्यानी सुरुवात ना होता मोठमोठ्या पर्वतांनी सुरुवात झालेला हिमालय आणि त्याच्या या पर्वत रांगा मधोमध खोल वाहणारी नदी . माझ्या साठी हे अदभूत दृष्य होते . रस्ता चांगला होता पण वळणा वळणाचा . मला वाटले आपणास खूप वेळ लागेल . सर्वसाधारण घाट म्हटले कि वेळ खाऊ काम . पण ड्रायव्हर मात्र हाडाचा होता . छोट्या वळणावर लिलाया वेगात गाडी वळवत आणि पळवत होता . माझी अवस्था जरा बिकटच झाली होती . खाली खोल दरी आणि बाजूचे कठडे चुकवत गाडीने घेतलेला वेग . घाटात हि ह्या वेगाने गाड्या चालताना मी प्रथमच अनुभवत होतो . प्रचंड गरम होत असल्यामुळे मी खिडकीची काच उघडीच ठेवली होती . पण दोन वळणे घेत गाडी पुढे गेली आणि अचानक खिडकीतून अंगाला झोंबणारा वारा आत येऊ लागला . मला कळेना ; वर निरर्भ आकाश , ढग नाहीत , आणि पावसाची पण शक्यता नाही , आणि गार वारा कुठून येत आहे . विवेक नी माझ्या मनाची तगमग ओळखली आणि स्मित हास्य करत म्हटले इसे तो कहते हैं हिमालय ! थंड गार वाऱ्यातून आणि डोंगर रांगेतील हिरव्या गर्द वनराईतून बस अवघड वळणे पार करत सोलन कडे मार्गक्रमण करत होती . बाजूला खोल दरी, पण दरीच्या दोन्ही अंगाला डोंगर उतारावरती झाडीतून डोकावणारे रंगी बेरंगी टुमदार बंगले डोळ्यांना आकर्षित करत होते . घरांची रचना आणि त्यांचे देखणे पण मनाला भुरळ घातल्या खेरीज राहात नव्हते . प्रश्न पडण्या सारखी गोष्ट म्हणजे एव्हड्या उंच ठिकाणी बांधकाम साहित्य कसे पोहचवले असेल . आणि त्या ठिकाणी हे लोक कसे काय राहात असतील ? पण काही वेळेनंतर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळत गेले , कारण हिमालयाच्या या भव्य दिव्य गगन चुंबी पर्वत रांगेत सपाट मैदान शोधून सापडत नव्हते . एक तर आकाशाला गवसणी घालणारी उंच शिखरे आणि एका बाजूला खोल - खोल दरी . आणि मग या परस्थितीत यांनी राहायचे कुठे ? आणि मग यांनी कल्पकतेतून उभा केले डोंगर उतारावर टुमदार देखणे बंगले . एक ते दीड तासाच्या निसर्गमय सफरी नंतर आम्ही सोलन या ठिकाणी पोहचलो . गाडी सोलन पर्यंतच असल्यामुळे ; पुढील प्रवास दुसऱ्या बस ने करणे जरुरी असल्यामुळे सामान खाली उतरून घेतले . आणि शेजारीच असलेल्या उपहारगृहा मध्ये थोडी पेट पूजा उरकून घेतली . हिमाचल प्रदेशातील अर्थात हिमालयातील पहिल्याच जेवणावर येथेच्छ ताव मारला . सूर्य आजून बऱ्यापैकी डोक्यावर असल्यामुळे हातामध्ये खूप वेळ शिल्लक असल्या कारणाने आम्ही शिमला या ठिकाणचा राहण्याचा बेत बदलून शिमला पासून पुढे 60 कि मी वर असलेल्या नारकंण्डा या ठिकाणी मुक्कामाचा बेत आखला . स्थानिकांकडून थोडी फार माहिती मिळवल्या नंतर आम्ही थेट नारकंण्डा ला जाणारी हिमाचल परिवहन ची गाडी पकडली . गर्द झाडीत लपलेलं निसर्ग रम्य पण रहदारी खूप असल्यामुळे सतत गजबजलेलं सोलन सोडल्यानंतर आम्ही निघालो ते शिमल्याच्या दिशेने . सोलन च्या पुढील रस्ता तुलनेने कमी अवघड होता . शेजारून जाणारी मिनी ट्रेन आणि तिचे छोटे छोटे बोगदे , भले मोठे वळण घेणारा लोहमार्ग आणि आजूबाजूला एखाद्या बागेला लाजवेल असा नैसर्गिक बगीचा . आणि मध्येच डोळ्यांना सुखावणारी , विरळ धुक्यांनी भरलेली विलोभनीय उथळ व्हॅली . व्हॅलीच्या बाजूला डोंगर उतारावर वसलेले एखादे टुमदार गाव . गावाच्या दिशेने नागमोडी वळणे घेत जाणारा ; कधी उतारावर तोल सावरणारा ; तर चढणीवर धापा टाकणारा अन् मध्येच गर्द झाडीत लुप्त होणारा चिंचोळा रस्ता . नजर जाईल तिकडे निसर्गाचा कालाआविष्कार च दिसत होता . माझे मन आता बस मध्ये कमी आणि डोंगर दऱ्यातच जास्त भटकायला लगले होते , आणि का नाही भटकावे ? गाडी ने जरा जास्तीचा धूर सोडायला सुरुवात केली होती . तीव्र चढ चालू झाला होता तसे निसर्गाने हि आपली कूस बदलली होती . सुंदर बगिच्यांच्या आणि टुमदार बंगल्याच्या ऐवजी ; डोंगर, झाडांची कत्तल करून सर्व परिसर व्यापला होता भल्या मोठया इमारतींनी. आणि हेच ते हिमाचल ची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शिमला . शहर खूप सुंदर होते . इंग्रजी डब्लू अक्षराच्या एका डोंगर रांगेवर हे शहर वसलेले आहे . व्हॅली च्या दोन्ही बाजू उंच उंच इमारतींनी व्यापल्या होत्या , पण एव्हडी मोडतोड होऊन सुद्धा निसर्ग हरला नव्हता . रिकाम्या जागेत आपले रंग उधळत होताच . दाटीवाटिने तोल सावरत उभ राहिलेलं हे शहर विलोभनीय भासत होत . पूर्वेकडच्या डोंगरावर. माफ करा ! पर्वतावर शेपटी वर करून हातात गदा घेतलेले हानुमानजी शहराच्या राक्षणा साठी तत्पर दिसत होते . उंच उंच हिरव्या देवधर वृक्षांच्या पार्शवभूमीवर हानुमानजी जरा जास्त च आकर्षक आणि बलदंड दिसत होते .पण हानुमानजीच एक बर होत ; ते गाड्यांच्या गोंगाटापासून दूर होते . शहर म्हटले कि गर्दी आलीच , पण छोट्या रस्त्यावर ही लेन कटिंग न करणारे व वाहातुकीचे नियम पाळणारे बहुसंख्येने दिसले . एरव्ही पुण्यनगरीत नियम तोडून वाहातूक कोंडी करणारे महाभाग भेटतात. पण इथे ती परस्थिती नाही जाणवली . त्या मुळे राजधानी सारख्या शहरातून बाहेर पडायला फार वेळ खर्ची पडला नाही . शिमला मध्ये रिकामी असलेली बस अत्ता मात्र खचा खच भरली होती . मला वाटले होते ; घाट रस्त्या मुळे इथे प्रवासी भरण्यावर मर्यादा असतील . पण तशी काही परस्थिती जाणवली नाही . मला मात्र खिडकीत जागा भेटल्या मुळे थोडा खुश होतो , पण हा आनंद फार काळ टिकला नाही . एका कॉलेज तरुणीने खिडकीत बसण्याचा आग्रह माझ्याकडे न धरता तिच्या सहप्रवासी आई कडे धरला . जरा आढे वेढे घेतच मी खिडकीची जागा सोडली . पण स्त्री शक्तीचा मात्र विजय झाला . मी मात्र या संधीचा फायदा घेत त्यांच्याशी थोडी जवळीक साधत , स्थानिक माहिती मिळवून ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करत होतो . प्रथम आमची चौकशी झाली . पुण्या हून आलो आहोत ! आणि ट्रेकिंग ला चाललो आहेत ! म्हटल्यानंतर त्यांचा आमच्याकडे बघण्याचा भाव बदलला . आणि त्या अगदी दिलखुलास पणे माझ्याशी गप्पा मारण्यात दंग झाल्या . रस्त्या मधील प्रेक्षनिय स्थळे , स्थानिक जीवनमान , शिक्षण , राजकारण , शेती , रोजगार , संकृती अशा अनेक विषयावर मनसोक्त गप्पा मारल्या . आता गाडी चढ सोडून थोडी सपाटीला धावत होती , तोपर्यंत गाडी ने ठियोग हे तालुक्याचे ठिकाण गाठले होते . ठियोग नंतर गाडी चढ सोडून उतारा ला लागली होती . डोंगर उतारावर पुष्कळ प्रमाणात शेती दिसत होती. कापडा खाली झाकून ठेवलेली मोठी झाडे ही दिसत होती . हा काय प्रकार आहे हे मला काही उमगेना , जास्त विचार न करता सहप्रवासी मॅडम ला विचारले तेव्हा समजले , कीटकांचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून सफरचंद ( ऍपल ) ची झाडे एका विशिष्ट कापडा नी झाकून ठेवाली आहेत . सफरचंद म्हटल्या बरोबर माझे कुतूहल जागे झाले , कारण सफरचंद भरपूर खाल्ले होते , पण झाड कधीच पाहिले नव्हते . जसजशी बस पुढे जात होती , तसे ऍपल चे मळे प्रचंड प्रमाणात दृष्टीस पडत होते . जिकडे पाहावे तिकडे डोंगर उतारावर पांढर पसरलेली दिसत होती . गप्पांच्या ओघात आणि निसर्गाचा प्रेमात बस एका छोट्या गावात थांबली . आणि कॉलेज तरुणी आणि अत्ता पर्यंत हिमाचल बद्दल भरभरून बोलत असलेल्या हिमाचली ताई गाडीतुन उतरण्याची घाई करू लागल्या . मी म्हटले काय झाले , त्यांनी उत्तर दिले हेच आमचे " मताना ” गाव . मला काही कळालेच नाही. परत विचारले गावाचे नाव काय ? तेव्हा मात्र कॉलेज तरुणीने चेहऱ्यावर लाडीळ हाव भाव आणत आणि हाताचे कोमल बोट नकारार्थी हालवत म्हटले " मत-आना ” . मी दिलखुलास हास्याची दाद देत , म्हटले नाही-नाही आज आम्ही तुमच्याकडे मुक्कामालाच येणार ! . ताईनी मात्र घरी येण्याचं निमंत्रण दिले ; आम्ही मात्र त्यांचे आभार मानत उलटप्रति त्यांनाच पुण्याला कधी आलात तर आमच्या कडे या ! म्हणत व्हिजिटिंग कार्ड त्यांच्या हातामध्ये सोपवले . आणि दोन तासाच्या अल्पजीवी घट्ट मैत्रीचा सुंगंध मनाच्या कुप्पीत साठवत एकमेकांना बाय बाय केला . सूर्य डोंगराच्या आड कधीचाच गेला होता , पण व्हॅली च्या पलीकडील डोंगरावर मात्र उन्हाच्या सोनेरी छटा शेवटच्या घटिका मोजत होत्या . आम्ही ही आज च्या प्रवासानी खूप दमलो होतो . हिमालयातील हा आजचा पहिला मुक्काम होता. पुणे ते नारकंण्डा हे जवळ पास १७०० कि मी चे अंतर आज पार केले होते . या मध्ये विमान प्रवास १२०० कि मी आणि ट्रेन व बस प्रवास ५०० कि मी पूर्ण केला होता . बस पण जवळ पास रिकामी झाली होती . आणि रिकाम्या शिट ची जागा कडाक्याच्या थंडीने घेतली होती . गार वारा आणि कडाक्याची थंडी मी तर गारठून गेलो होतो . उबदार कपडे बॅग मध्ये बस च्या वर ठेवल्यामुळे आत्ता अंग चोरून बसण्या शिवाय पर्याय नव्हता . बाहेर व्हॅलीत रिकाम्या जागे चा ताबा धुक्यांनी घेण्याला सुरुवात केली होती . ७ वा च्या अगोदरच पशु-पक्षानसह झाडांनी ही पाय पोटात घेण्यास सुरुवात केली होती . मात्र बिचारी आमची एकटी बस वळणा मागून वळणे घेत मंद दिव्याच्या प्रकाशात अंग चोरून थंडीतून ही सुसाट धावत होती . मला मात्र आजच्या पहिल्या मुक्कामाची थोडी उत्सुकता आणि थोडी थंडीची भीती हि होतीच . शेवटी एक तीव्र चढ पार करून गाडी ने ७:३० वा नारकंण्डा गाठले .
NARKHANDA , HIMACHAL ,
NARKHANDA , HIMACHAL ,
विवेक सरांच्या सुचने नुसार एक टीम बॅगा खाली घेण्यात गुंतली तर दुसरी टीम रूम शोधण्यास निघाली . गाव खूप छोटे असल्यामुळे जास्त न फिरता रूम लगेच मिळाली . टीम परत येई पर्यंत स्वर्ग से सुंदर दिसणाऱ्या शिवजीच्या चौकातील मंदिराचे दोन चार मस्त फोटो काढले . खरोखर च हिमालय कधी पण पहा तो सुंदरच दिसणार ! मंदिर छोटे होते , पण त्याच्या पाठीमागील डोंगरावर उभे असलेले सुचिपर्णी वृक्ष त्याची सुंदरता आणि शोभा वाढवत होते . अंधारात ही आकाश निळेशार वाटत होते . वा किती मस्त ! म्हणत आणखी दोन फोटो काढले आणि बॅग पाठीवर टाकत हॉटेल च्या दिशेने निघालो . हॉटेल वर गेल्यानंतर समोरच्या सतलूज व्हॅली कडे नजर टाकली तर काय ; फक्त सूर्य तारे नाही तर आख्खे भ्रमांडच धरतीवर आवतारल्याचे भासत होते . डोंगराच्या पोटात निद्राधीन झालेल्या गावातील विजेचे प्रकाशमान दिवे आकाशातील ताऱ्यांशी स्पर्धा करू पाहत होते , नयन रम्य नजरा होता तो . फ्रेश झाल्यानंतर पोटातील कावळ्याची काव काव जरा जास्त च वाढली होती . तो पर्यंत जास्त वाट न पाहायला लावता वेटर ने रुम मध्येच ताट लावले , आणि भुकेल्या पोटाने आणि व्याकुळ मनाने जेवणावरती येथेच्छ ताव मारला , आणि गारठलेल शरीर स्लीपिंग बॅग च्या आत कोंबून हिमालयाच्या कुशीत निद्राधीन झालो .
१ मे ची पहाट उजाडली ती अनोळखी पक्षांच्या किलकिलाटाने , थंडी प्रचंड असल्या मुळे आंथरुणातून बाहेर येण्याचे मन करत नव्हते . कालची रात्र पुण्याच्या ४२ डि . सें . तापमानामध्ये आणि आजची ही नारकंण्डा मधील रात्र ४ डि. सें. म्हणजे ३८ डि. चा फरक . थंडीच्या या प्रचंड माऱ्याचा पुढचे काही दिवस सामना करावयाचा असल्यामुळे मनाची तयारी करत अंथरूनातून काढता पाय घेतला . रूम च्या बाहेरील वातावरण अगदी कुंद होते , संपुर्ण हिमालय धुक्याच्या पांढऱ्या चादर मध्ये लपेटून निपचित पहुडला होता . धुक्याची चादर सर्वदूर पसरली होती . समोर दिसणारी व्हॅली धुक्यांनी झाकून गेली होती . हिमालयाच्या कुशीतून बाहेर आलेले काही देवधार चे वृक्ष धुक्यातून हाळूच मान वर करून थंडीची चाहूल घेत होते. समोर दिसणारा “ हाथूपिक ” नावाचा पर्वत धुक्यामध्ये हरवून गेला होता . उगावतीच्या दिशेने सूर्याची कोवळी किरणे धुक्याला हुसकवण्याचा प्रयत्न करत होती , पण त्यांचा प्रयत्न फारच तोकडा वाटत होता . काही वेळातच कोळया किरणांनी आक्रमक रूप धारण केले आणि धुके हाळू हाळू मागे हाटू लागले . समोर खूप दूरवर हिमशिखरे दृष्टीस पडत होती . आंतर खूप होते , पण उन्हाच्या किरणांनी ती अधिक तेजस्वी दिसत होती . उंचच उंच आकाशाला गवसणी घालणारे सुचिपर्णी वृक्ष , आणि त्यामागे हिरवेगार वृक्ष वेलींनी नटलेले डोंगर आणि त्याच्या पुढे निळ्याशार आकाशाच्या पार्शवभूमीवर पांढऱ्या शुभ्र हिमशिखरांची रांग . किती नेत्र दिपक नजारा होता तो . गुढघ्याचा आधार घेत , हात दुमडून त्याच्यावर हानुवटी ठेवावी अन् तासनतास या निसर्गा च्या कुंचल्यातून रेखाटलेल्या कलाकृती कडे एक टक लाऊन पाहत बसावे . माझी ही अशीच इच्छा झाली होती . पण विवेक मास्तरांनी माझा डाव ओळखला आणि म्हटले “ चलो शिवाजीराव ! ये तो झाकी हैं । पिक्चर और बाकी हैं । मी भानावर येत सरांकडे पाहून हसलो . आणि पुढच्या टप्या च्या दिशेने मार्गस्थ होण्यास सज्ज झालो . खरे तर आज “ हातूपिक ” चा ट्रेक करून पुढे जाणार होतो , पण प्रचंड धुक्या मुळे हातूपिक वरून दिसणाऱ्या दृश्याला आम्ही मुकणार होतो , म्हणून हातूपिक चा ट्रेक रद्द करून आम्ही सरळ पुढची बस पकडून निघण्याची तयारी केली . सकाळचे ९ वाजले होते , तरी थंडी कमी होत नव्हती . थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे अंगभर चढवले होतेच , तरी पण बस ची वाट पाहात कोवळ्या उन्हात थांबलो . फार वेळ प्रतिक्षा करावी लागली नाही . पंधरा ते वीस मिनिटाच्या वेळेत दोन बस येऊन थांबल्या . कमी गर्दी असलेली दिल्ली ते रेकाँगपिओ बस पकडली . सर्वांचे मिळून सामान जास्त असल्यामुळे ते बस मध्ये ठेवण्याचा प्रश्नच उद् भवत नव्हता . बस आली की दोघांनी मिळून बस वर चढून सर्व बॅग्स लोड करायच्या हा आता शिरस्ताच पडला होता . बस दिल्ली हून आली असल्यामुळे बस मधील प्रवासी बऱ्यापैकी पेंगत होते . पण काहींची झोप मोड करून ; सरकून बसण्याची विनंती करत शिट वर जागा मिळवली . नारकंण्डा सोडल्या नंतर रामपूर पर्यंत कुठे हि चढ आढळत नाही . कारण नारकंण्डा ची समुद्र सपाटी पासून ची उंची २७१० मीटर आहे, तर रामपूरची उंची १०२७ मीटर आहे . या वरूनच आपण अंदाज लाऊ शकतो की किती तीव्र उतार असेल . गर्द झाडीतून आणि वळणा वळणा च्या रस्त्याने गाडीने वेग पकडला होता . एका बाजूला उंच डोंगर तर एका बाजूला वृक्ष राईने नटलेले डोंगर उतार . तर त्याच्या खाली सफरचंदाच्या बागानी नटलेल्या छोट्या डोंगर टेकड्या , आणि त्याचा आडोशाला लपलेली टुमदार गावे . लांब पर्यंत विरळ धुक्यात हरवलेली विस्तीरन व्हॅली . समोरचा परिसर तुलनेने खूप मोकळा आणि सुंदर दिसत होता . मधोमध लांब पर्यंत एक नदी वाहाताना दिसत होती . नदी कुठल्या दिशेला वाहत आहे हे मात्र समजत नव्हते . पण हे नक्की कि ही सतलूज नदी असावी . कारण काल गप्पांच्या ओघात “ मतानाच्या ” ताईनी मला ही माहिती दिली होती . तरी पण माझी जिज्ञासू वृती मला स्वस्त बसू देत नव्हती . नक्कीच सतलूज असेल का ? मग कुठली वाहिनी असेल ? उगम कुठे असेल ? असे एक ना अनेक प्रश्न मला सतावत होते . तशी गाडी मनाच्या वेगा इतकीच सुसाट निघाली होती . तासाभराच्या प्रवासानंतर गाडी अल्पोउपहारासाठी थांबली . आमची अगोदरच पेट पूजा झाली असल्यामुळे ; आम्ही आमचा मोर्चा फोटोग्राफी कडे वळवला . आर्धा तास मनमोहक निसर्गाचे , आणि त्याच बरोबर आमच्यातल्या काही रुबाबदार व्यक्तिमत्वांनी मॉडेलिंग फोटोग्राफीचा आनंद लुटला . धुके पूर्ण कमी झाल्या मुळे व्हॅली खूप सुंदर दिसत होती . आणि गाडी ही या सुंदर व्हॅली च्या दिशेनेच धाव घेत होती . नदी आता स्पष्ट दिसत होती , तिचे काचे सारखे दिसणारे पाणी खळाळत उसळ्या घेत पश्चिमे कडे धावत होते . आणि पुन्हा एक वळण घेऊन उत्तरे कडे धावत होते . पुन्हा माझ्या मनाची अवस्था झाडाला उलड्या लटकलेल्या वटवाघूळा सारखी होत होती . खरे तर सतलूज नदी पंजाब मध्ये जाते , पंजाब आहे दक्षिणेकडे आणि नदी जाते उत्तरेला . फार विचार न करता आधुनिक टेक्नालॉजीचा वापर करत , मोबाईल वर गुगल मॅप ओपन केला . आणि संपूर्ण पंजाब , हिमाचल प्रदेश , जम्मू काश्मीर आणि अर्ध्या पाकिस्थानची सैर करून आलो .आणि लक्षात आले की सतलूज पुढे जाऊन पुन्हा दक्षिण वाहिनी बनते आणि थेट भाक्रा नांगल जलाशयाला मिळते . त्या बरोबर सतलूज चा तिबेट मधला उगम हि शोधला , आणि हे ही लक्षात आले की पुढचे काही दिवस आपण सतलूज च्या सहवासात असणार आहोत . विचार चक्रा मध्ये असतानाच गाडी ने सतलूज ची साथ केव्हा पकडली ते लक्षातच आले नाही . उताराचा घाट संपून आम्ही पूर्ण पाणे नदीच्या शेजारून प्रवास करत होतो . काचे सारखे लख्ख पाणी भर उन्हाळ्यात ही अवखळ पणे उडया मारत , दगड गोट्याशी मस्ती , तर उंच उंच तुषार उडवत “ सैराट ” होऊन चिंगाट आणि बुंगाट धावत होते . पाण्याला प्रचंड वेग होता . एव्हड्या कमी पाण्याचा हा प्रचंड वेग पाहून हे नक्की लक्षात आले की ; हिमालयातील नद्याना पूर आल्या नंतर ' होत्याचे नव्हते ' का होत असेल . दोन्ही बाजूने डोंगर असल्यामुळे हिमालयातील नद्यांना विस्ताराला फार कमी वाव मिळतो, आणि तीव्र उतारामुळे प्रचंड वेग . त्या मुळेच हिमालयामध्ये प्रपात घडून येतात . अवखळ पाण्याच्या संगतीने काही अवघड वळणे घेत आणि निमुळते पूल पार करत बस ने रामपूर गाठले .
रामपूर सतलज नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर शहर , सतलूज नदीचा अखंड वाहणारा प्रवाह आणि दोन्ही किनाऱ्यावर टप्प्याने बांधलेली टुमदार रंगी बेरंगी घरे आणि दळणवळणा च्या सोईसाठी बांधलेले लहान मोठे पूल सतलूज बरोबरच रामपूर शहराच्या सौंदर्यात भर घालत होते . रामपूर बस स्थानकावरून दिसणारी सतलूज म्हणजे स्वर्गातून धर्तीवर आवतरलेली गंगाच जणू . रामपूर तसे पुरातन काळापासून या मार्गा वरचे महत्वाचे शहर , त्यामुळे इथे सतत वर्दळ जाणवते . रामपूरचे वैशिष्ट्ये म्हणचे हिमालयातील इतर शहराच्या तुलनेत येथील तापमान खूप जास्त होते . आज सकाळी नारकंण्डा मध्ये अंदाजे २ ते ४ डिग्री तापमान असेल , आणि येथे दुपारी १२ वाजेपर्यंत तापमान पोहचले होते ३० ते ३२डिग्री पर्यंत . अर्ध्या तासाच्या व्हॉल्ट नंतर गाडी मार्गस्थ झाली , तुलनेने गाडीमधील गर्दी कमी झाली होती . आणि रस्ता हि तुलनेने अवघड होत चालला होता . सतलूज चे चिंचोळे पात्र खूप खोल खोल वाटायला लागले होते . रस्त्याची आता दिशा ही बदली होती आणि दशा ही .रस्ता दरीच्या तोंडाला भिडून परत मागे येत गर्रकन गिरकी घेत काळजाचा ठेका चुकवत होता . दोन्ही बाजूनी उंच उंच डोंगर आणि मध्ये ओढया सारखी दिसणारी खोल नदी . व्हॅली च्या आजूबाजूला काही दिसत नव्हते . अरुंद व्हॅलीतून डोंगराचे पोट कापून बनवलेल्या खाची वजा रस्त्यातून आमची गाडी जीव मुठीत घेऊन धावत होती . काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात डोंगर फोडण्याची कामे चालू असल्याचे दिसत होते . दगड आणि मातीचे लोट खाली नदीच्या पात्रा पर्यंत घरंगळत आलेले होते . काही ठिकाणी नदीत पण तोड फोड चालू होती . जसजसे पुढे जात होतो तसे जास्तच प्रमाणात धुळीचे लोट दिसत होते . काही ठिकाणी डोंगराला बोगदे बनवण्याचे काम ही चालू असल्याचे जाणवले . बऱ्याच ठिकाणी रस्त्यालगत कामे चालू असल्यामुळे रस्ता प्रचंड खराब होता . हा वसुंधरेचा ऱ्हास पाहून मन सुन्न झाले , हे कशासाठी चालले होते काहीच कळत नव्हते . बावरलेल्या नजरेने हे सर्व पाहत असताना , काही ठिकाणी गैरसोयी बद्दल दिलगिरी व्यक्त करणारे फलक दिसले आणि त्या खाली भारतातील नामांकित पावर प्रोजेक्ट कंपण्याची नावे होती . आणि मग क्षणात डोक्यात वीज चमकली ; आणि कळून चुकले की ; खोट्या प्रगतीच्या विळख्यात अडकलेल्या दुष्ट मानवाचेच हे काम आहे .पाहावे तिकडे धूळ , प्रचंड प्रमाणात डोंगरावरून खाली आलेला मलाबा , मशीनची आणि ब्रेकरची धडधड . मन खूप विष्षण झाले . प्रगती सर्वांनाच हावी आहे , पण निसर्गाचा समतोल राखून प्रगती हवी आहे . वसुंधरेवरच घाला घालून प्रगती करणार असाल तर ; अशी दुबळी प्रगती कुणाच्या कामाची ? डोंगर फोडून घर बांधण्या पर्यंत ठीक आहे , कारण येथे सपाट जागाच उपलब्ध नाही . पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रगत झालो , आमच्या राज्यात हाजारो मेगावॅट वीज तयार होते , आम्ही विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत . आम्ही वीज पुरवठादार आहोत . ही प्रगती म्हणजे जिवंत पाणी समाधी खोदून ठेवण्यासारखे आहे . शेख चिल्ली ची प्रगती पाहात पुढे आलो . रस्त्या मध्ये काही ठिकाणी डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणाऱ्या आय टी बी पी फोर्स चे कॅम्पस् दिसत होते . दुपारचे १२ वाजून गेले असल्यामुळे पोटातील कावळ्यांची फडफड जाणवत होती . काही वेळातच ज्युरी गावामध्ये गाडी थांबली आणि कंडक्टर चे “ खाना बिना खा लो , गाडी आधा घंटा रुकेगी ” हे शब्द कानावर पडताच हायस वाटलं आणि शेजारच्याच हॉटेल मध्ये जेवणावरती येथेच्छ ताव मारला. ज्युरी च्या पुढचा रस्ता खूपच खराब आणि अवघड ही होता . खूप ठीकाणी लँड स्लाईड झालेले होते . त्या मुळे रस्त्याला खूप ठिकाणी अतिशय अवघड जागेतून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले होते . त्यामुळे गाडी ने पण गती सोडून भीती पकडली होती . प्रवास खूप जीव घेणा होता . खाली खोल दरी आणि वर लँड स्लाइडींग चा धोका . मला तर एखाद्या गुहेतच आल्यासारखे वाटत होते . अरुंद व्हॅली , त्या मध्ये उफाळून वाहणारी नदी , चिखल मातीचा निसरडा रस्ता , काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता ही वाहून जाण्याची भिती . या सर्व गोष्टीत माझे लक्ष फक्त ड्रायव्हर वरच होते . कारण तोच एक सर्वांचा तारण हार होता . त्याच्या एका छोट्याशा चुकीची किंमत गाडीतील सर्व प्रवाशांच्या जीवावर बेतनारी होती . पण विशेष म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भिती , राग किंवा त्रागा , चिडचिड जाणवत नव्हती . कारण आम्ही रस्त्याला साधा खड्डा जरी दिसला तरी , नागरसेवका पासून ते थेट पंतप्रधाना पर्यंत सर्वांच्या कुळीचा उध्दार करत असतो . आता मात्र मला खरोखरच गुहेत गेल्यासारखे च भासत होते व्हॅली अजून अरुंद झाली हाती , बाजूला उंच उंच पर्वत , आणि समोर ही सतलूज जसे वळण घेईल , तसेच वळण बस घेत होती . या सर्व भितीदायक वातावरणात एकच ती प्रफुल्लित करणारी गोष्ट म्हणजे , याची देही याची डोळा प्रथमच डोळे भरून पाहात होतो ते बर्फ़ाचे ( बर्फाच्छादित ) डोंगर . दोन्ही बाजूला आणि समोर ही पांढरी शुभ्र हिमशिखरे डोळ्याचे पारणे फेडत होती . आत्ता पर्यंत फक्त टी व्ही आणि चित्रपटात पाहिलेली दृष्य मी आज प्रत्यक्षात अनुभवत होतो . भान विसरून मी गाडी च्या खिडकीतून अधाशा सारखा हिमशिखरे न्याहळत होतो . आता सूर्य मावळतीकडे झुकला होता . गाडी ने कधी उजवी कडे तर कधी डावी कडे झुकत आणि तात्पुरते उभे केलेले पूल ; पूल नव्हे साकव , पार करत धुराळा उडवत करच्छम गाठले . करच्छम येथे रस्त्याच्या कडेलाच एक छोटे खानी धरण आहे . शेजारच्या डोंगराच्या पोटात भला मोठा पावर प्रोजेक्त आहे . त्या मधून बाहेर आलेले पाणी पुन्हा बाहेर आडवून त्या द्वारे वीज निर्मिती केली जाते . हा त्या धरणाचा उद्देश झाला , पण दोन्ही बाजूनी उंच उंच डोंगर आणि मध्ये अतिशय सुंदर दिसणारा हा डॅम आपसूकच भाव खाऊन जातो. सांगला व्हॅली मध्ये जाणारा रस्ता येथूनच जातो . गाडी ने पुन्हा धुळीने आणि दगड मातीने भरलेला रस्ता धरला आणि कभी दाये । तो कभी बाऐ करत धावू लागली . समोर किन्नोर कैलास शिखर दोन हिमशिखराच्या मधून दर्शन देत होते . अतिशय उंच असणारे हे शिखर मावळतीची किरणे पडल्या मुळे सोन्याचा मुलामा दिल्या सारखे भासत होते . गाडीतील सर्वांनी कैलासाचे मनोभावे धावते दर्शन घेतले , तेव्हा मी ही मागे कसा राहील . मी पण मनोभावे नमन करत कैलासा चे रूप डोळ्यात साठवले . तो पर्यंत गाडी ने डावी कडे वळण घेतले , ते पण सतलूज ने वळण घेतल्या मुळेच . कैलास आता दिसेनासे झाले होते . त्याच्या समोरची पांढरी शुभ्र हिमशिखरे साथीने पुढे निघाली होती . डाव्या बाजूला उंच कातळ आणि उजव्या बाजूला देवधार वृक्षाच्या पार्शवभूमीवर हिमशिखरे . पण खालच्या बाजूला मन विषण्ण करणारी ; मानवी प्रयत्नातून चालू असलेली यांत्रिक धडपड . बस ने सतलूज ची साथ सोडत डावे वळण घेतले , आणि गर्द झाडीतून जाणाऱ्या अतिशय अरुंद घाट रस्त्याने चढणीचा मार्ग पत्कारत , शिल्लक राहिलेली सर्व ताकत पणाला लावत रेकाँगपिओ गाठले . जीव मुठीत धरून एखाद्या अंधाऱ्या गुहेत घुसावे आणि आत गेल्यानंतर डोळे दिपवणाऱ्या स्वप्नातल्या नगरी मध्ये प्रवेश व्हावा . मनातल्या भीतीने स्वच्छंदी होऊन बागडावे , अशीच काहीसी अवस्था माझी झाली . दिवस भराचा जीव घेणा प्रवास करून , जेव्हा सात कि मी चा सुंदर घाट चढून आल्यानंतर रेकाँगपिओ मध्ये पोहचलो ; तेव्हा मात्र स्वर्गातच आल्याची अनुभूती आली . स्वप्नात ही वाटले नव्हते ; कि या डोंगरावर वर कुठे एखादे गाव असेल . पण येथे फक्त गावच नव्हते तर येथे चक्क जिल्हा मुख्यालय होते . हिमाचल मधील किन्नोर या जिल्हाचे रेकाँगपिओ हे मुख्यालय . शहर खूप मोठे आणि सुंदर आहे . पाहावे तिकडे हिमच्छादीत शिखरे आणि आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष , रंगीबेरंगी घराची वैविध्यपूर्ण रचना या मुळे तर शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते . गर्दी गोंगाट खूप कमी , वाहतूक ही खूप कमी . सर्व कशे शांत - निवांत . राहण्यासाठी हॉटेल ची चौकाशी केली असता , समजले की येथून पुढे चार कि मी वर काल्पा मध्ये राहण्याची खूप चांगली सोय आहे . सोई सुविधे पेक्षा विशेष म्हणजे या ठिकाणाहून कैलास किन्नोर चे सौंदर्य अधिक खुलून दिसते . सूर्य अस्ता कडे झुकला होता ( सूर्य दिसत नव्हता , पण एक अंदाज लावला ) , वेळ ना दवडता उभी असलेली बस पकडली , आणि आम्ही उंचावरून अधिक उंची कडे उड्डाण ( प्रस्थान ) केले . साधारणतः पिओ ची उंची 2850 मी. आहे , आणि आमचा आजचा मुक्काम होता 3250 मी उंचीवर . पिओ ते काल्पा हे अंतर चार कि. मी . आहे . या चार कि मी च्या अंतरामध्ये दोन - तीन ठिकाणे सोडली तर कोठेही शेती किंवा बागा दिसल्या नाहीत . अरुंद रस्ते आणि टुमदार घरांची आणि दुकानांची दाटी . पिओ आणि काल्पा तसी दोन्ही जुळी गावे . बस ने झोकातच काल्पा गाठले . खाली उतरून समोर पाहतो तर काय ? प्रत्यक्ष स्वर्ग धर्तीवर आवतरला होता . संधी प्रकाशात सुद्धा कैलासाचे रूप दृष्ट लागावे असेच दिसत होते . संपूर्ण शिखर सोनेरी रंगात न्हाऊन निघाले होते . मध्येच काही पांढऱ्या शुभ्र रंगाचे ढग कैलासाला आपल्या कवेत घेऊन गळा भेट घेत होते . अप्रतिम , सुंदर , वाह ! , लई भारी अशी अनेक विशेषण माझ्या तोंडातून आपसूक बाहेर पडत होती . आणि मनात म्हटले उगीच नाही पडला भोळा शंकर या हिमालयाच्या प्रेमात ! विवेक सरांच्या आवाजाने भानावर आलो , महाराज ! रूम शोधायला निघा . जास्त पाय पिट न करता “ ब्ल्यू लोटस् ” नावाच्या हॉटेल मध्ये रूम मिळाली . रूम कशी आहे हे न पाहता समोरच्या बाल्कनी मधून हिमशिखरांचे आणि कैलासाचे मनमोहक दृश्य नजरेस भावले आणि त्याच्यावरच भाळून रूम बुक केली . दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी ताजातवाना होऊन चहाचा कप हातात घेत , आराम खुर्चीत बसत मस्त पायाची आडी टाकली आणि सांजवेळी दिसणारे हिमशिखरांचे अप्रतिम रूप डोळ्यात साठवत पहातच राहिलो . दिवसभराच्या प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला ते समजलेच नाही . घराच्या आठवणी चा तर दूर दूर पर्यंत कुठे शोध ही लागलत नव्हता . शेजारी लक्ष गेले तर , जालिंदर उभा होता . तो ही एक टक लावून कैलासात हरवून गेला होता . तीच अवस्था संजय , भास्कर , राजेश आणि दिगंबर ची सुद्धा झाली होती . जालिंदर कडे पाहत माझ्या तोंडातून शब्द निघाले , जन्नत - जन्नत म्हणतात ती हीच का रे भाऊ ! जालिंदर ने फक्त स्मित हास्य करत विवेक कडे नजर टाकली . मी खुश आहे एव्हडेच त्यांनी जाणले . वेटर च्या आवाजाने आम्ही सर्व जण भानावर आलो आणि जेवणाच्या दिशेने निघालो . आज जेवणात ही रंगत आली. आज जेवणासाठी आमच्या बरोबर इस्राईल च्या एका प्रेमी युगुला ने कंपनी दिली . तेव्हा पुन्हा एकदा इस्राईल - भारत मैत्रीचा एक नवा अध्याय लिहला गेला . भरपूर जेवणा बरबरीने भरपूर गप्पा ही झाल्या . सांस्कृतिक देवाण घेवाण ही झाली . हास्यांचे फवारे ही उडाले आणि विशेष म्हणजे इंग्रजी चा भरपूर सराव ही . आणि शेवटी अतिती देवो भाव ! या संस्कृत वचनाप्रमाणे भास्कर मोरे यांनी पाहुण्यांना केलेला आग्रह आणि हास्याची लकेर उमटवत आजचा सार्थकी लागलेला दिवस मनाच्या गाभार्यात आनंत काळासाठी राखून ठेवत मी मी म्हणणाऱ्या थंडीतच निद्राधीन झालो .
२ मे ची रम्य सकाळ . आज काही घाई गडबड नाल्यामुळे सर्वजण जरा निवांतच उठले .पण काल चर्चे दरम्यान असे कळाले होते की ; कैलास शिखर दिवसातून सात वेळा रंग बदलते . म्हणून उशिरा उठल्या मुळे थोडे वाईट वाटले , कारण आपण आज सूर्योदय समईचा रंग निश्चितच मिस केला असेल . बाहेर येतो तर काय ; विवेक मास्तर कॅमेरा सेट करून कैलासचे विविध रंग टिपण्यात दंग झाले होते . विवेकला पाहताच मी म्हटले सॉरी सर ! जरा जास्तच वेळ झोपलो ! विवेक नी म्हटले , कोई बात नही अभी तो रंगा रंग की शुरूवात हुई हैं । आणि मी मग छायाचित्रणाच्या प्रेमात न पडता ; सरळ सर्व दृश्य डोळ्याच्या कॅमेऱ्यातून खेचत ह्रदयाच्या आल्बम मध्ये साठवू लागलो . काही हिमशिखरे बर्फाच्या विळख्याने कुडकुडत होती तर काही अग्नीकुंडातील तप्त निखाऱ्या प्रमाणे लालबुंद दिसत होती . जणू काय सूर्य देवनी आपल्या भात्यातून अग्नी बाणांचा वर्षावाच केला आहे . कैलासाचे हे सुंदर दृश्य फक्त आणि फक्त काल्पा मधूनच दिसू शकते हे मात्र नक्की . हिमशिखरावर पडलेल्या उन्हाच्या किरणांची भौतिक प्रक्रिया घडल्या मुळे दिवसमध्ये वेगवेगळ्या वेळी कैलास शिखर वेगवेगळे सात रंग परिधान करत होते . हि नाट्यमय प्रक्रिया कॅमेऱ्या मध्ये टिपणे अशक्य , पण डोळ्याच्या कॅमेऱ्या मध्ये टिपण्यापासून कोणीही रोकू शकत नाही . आजचा दिवस आम्ही फक्त या सात रंगा साठी राखीव ठेवला होता . त्या मुळे आज कुठल्या ही प्रकारची घाई गडबड नव्हती . कैलासाच्या रंगा बरोबरीने मनातले रंग उडवणे , एव्हडेच ते आज काम होते . आजू बाजूची शिखरे ही आपल्या सौंदर्याची भुरळ पाडत होती . सोमोरच काल्पा मधील मॉनेस्ट्री ही वाऱ्यावर उडणाऱ्या पताकाच्या बरोबरीने आपले रंग उधळत होती . शिल्प कलेचा आणि सौंदर्या चा अद्वितीय नमुना काय असेल ? तर ती ही मॉनेस्ट्री . उंच टेकडी वजा जागेवर बांधलेली मॉनेस्ट्री आणि त्याच्या पाठीमागे हिरव्या वनराईच्या बरोबरीने नटलेली पांढरी शुभ्र हिमशिखरे . त्यावर पडलेली सूर्य किरणे , काय अप्रतिम सोंदर्य . त्याला शब्दा मध्ये बांधणे म्हणजे , काजव्याने चंद्राच्या खोड्या काढल्या प्रमाणे . सृष्टी निर्मात्याचे सर्व रंग याच ठिकाणी संपले की काय ? आसा प्रश्न मनाला पडला . फार दिवसापासून अन्न पाणी न मिळालेल्या माणसाचा समोर अचानक पंचपकवान्न चे ताट यावे , आणि त्याने अधाशा सारखा त्यावर ताव मारावा. अशीच काहीशी माझ्या सह सर्वांची अवस्था झाली होती . कैलासा वरती रंगाची उधळण करत सूर्य रथ जोरात पुढे सरकत होता . तसे काल्पा आणि पिओ ( रेकाँगपिओ ) सूर्य किरणामध्ये न्हाऊन निघाले होते . आम्ही ही सर्वजण गरम पाण्यात न्हाऊन घेत , फ्रेश होऊन मॉनेस्ट्री च्या दिशेने निघालो . संपूर्ण पणे लाकूड वापरून उभा केलेली ही वास्तू आणि लाकडावर केलेले उत्कृष्ट कोरीव काम , या मुळे मॉनेस्ट्री सुरेख आणि सुंदर दिसते . मॉनेस्ट्री च्या समोर आणि चारही बाजूने बसवलेले प्रेअर व्हील सुंदरतेला अतिसुंदर बनवतात . व्हील फिरताना त्याच्या गती मधून निर्माण होणाऱ्या ध्वनी मुळे आणि त्यालाच बांधलेल्या घंटेच्या निनादाने मन अगदी प्रसन्न होऊन जाते . व्हील फिरवल्या मुळे पाप ही कमी होते अशी श्रद्धा ही त्या पाठीमागे आहे . व्हील फिरवत प्रसन्न मनाने मॉनेस्ट्री मध्ये प्रवेश केला , तेव्हा आतील शांतता आणि स्वच्छता पाहून मन अगदी प्रसन्न झाले . प्रार्थनेची पध्द्त किंवा नियम माहीत नसल्यामुळे समोरच्या विशिष्ट पध्द्तीने केलेल्या सजावटीकडे आणि बुद्धांच्या फोटोकडे पाहून मनोभावे नमस्कार केला . तेव्हा खरोखरच मनातले अहम भाव गळून पडल्याची भावना निर्माण झाली . मॉनेस्ट्री मध्ये फेरफटका मारल्या नंतर समोर दिसणाऱ्या कैलासाच्या विहंगम दृष्याचे मनसोक्त फोटो घेतले . त्यानंतर चार कि मी दूर असलेल्या पिओ मध्ये खरेदी सह फेरफटका मारण्यासाठी चार कि मी चा ट्रेक केला . पुन्हा एकदा संध्याकाळच्या वेळी कैलासच्या रंग संगतीवर लक्ष ठेवत काल्पा मधील साईड सीन आणि सफरचंदाच्या बागांमधून फेरफटका मारत आकाशाला भिडणाऱ्या पर्वतांच्या बरोबरीने , अंगाचा थरकाप उडवत पाताळात घुसणाऱ्या खोल दऱ्या चां ही थरार अनुभवला . थरार अनुभवत असताना ; हिमालयातील पहिल्या पावसाचा ही फटका बसला . कडाक्याच्या थंडीतच टपोरे थेंब अंगावर झेलत हॉटेल गाठले . काही वेळेपूर्वी सूर्य आकाशात तळपत होता आणि पुढच्या काही वेळेतच निसर्गाचे हे लहरी रूप . संपूर्ण हिमशिखरे ढगांच्या वेष्टनांनी आच्छादून गेली होती . सर्वत्र काळोखमय वातावरण तयार झाले होते . प्रचंड गारवा निर्माण झाला होता . आणि हाच तो हिमालयातील लहरी निसर्ग . क्षणात काय होईल माहीत नाही; अशी परस्थिती . तासाभराच्या पावसानंतर सूर्याची किरणे पुन्हा ढगांच्या आडून डोकावू लागली , आणि पुन्हा एकदा आकाश निर्भर झाले . काही वेळेपूर्वी शिखरांच्या डोक्यावर असलेला बर्फ पायापर्यंत आला . संपूर्ण पर्वत राजी पांढरी शुभ्र दिसू लागली . इकडे पाऊस होता तेव्हा तिकडे बर्फबारी होत होती . ढगांच्या पाठीमागून आलेल्या सूर्याच्या किरणांनी पुन्हा एकदा कैलासाचे रंग बदलत होते . काही क्षणापूर्वी तांबट रंगाचे दिसणारे शिवलिंग निळसर रंगाचे दिसत होते . पाऊस आला म्हणून दुःखी न होता या ही क्षणाचा आनंद लुटत , आम्ही पुन्हा एकदा शिवाचे रंगीत रूप कॅमेऱ्यात बंद करण्यात दंग झालो .
TIRANGA , RECONG PIO , KINNOUR KAILAS
TIRANGA , RECONG PIO , KINNOUR KAILAS

३ मे च्या गोठवणाऱ्या थंडीतच आंघोळ करून बॅग भरण्यास सुरवात केली . कारण पुढचे पाच सहा दिवस अंघोळ मिळण्याची खात्री नव्हती. प्लॅन प्रमाणे आजचा मुक्काम ठंगी या ठिकाणी करून उद्या पासून ट्रेकिंग साठी निघणार होतो . त्या प्रमाणे सर्वांनी निघण्याची तयारी केली . पुन्हा एकदा काल्पा मधून दिसणाऱ्या स्वर्ग से सुंदर दृष्याचे डोळे भरून दर्शन घेतले आणि थेट पिओ ची बस पकडली . ठंगी ला जाण्यासाठी सकाळी ९ वाजता एकच बस असते , त्या शिवाय दुसरा काही पर्याय नाही . ठंगी ते पिओ साधारणतः ५० कि मी चे अंतर आहे . ठंगी , लंबार , चरांग , ललांती , चरांग बेस , चरांग पास ते छितकुल असा ट्रेक रूट होता . पुढची तयारी ही महत्वाची होती . त्यामुळे काही स्थानिकांच्या मदतीने ठंगी मधील पोर्टर चे नंबर मिळवले . काल पाऊस आणि बर्फ बारी झाल्या मुळे वातावरण म्हणावे तेव्हढे पोषक नव्हते . सर्व पर्वत पांढरे शुभ्र दिसत होते . उत्सुकता होती ती ट्रेक रूट वरील वातावरणाची. बस ने वेळेत पिओ सोडले . डोंगर उतरून बस सतलूजच्या किनाऱ्यांवर पोहचली . रस्ता आतिशय खराब होता , ठिकठिकाणी लँड स्लाईड झालेले दिसत होते . डोंगरावरून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट खाली येत होते . या पाण्याच्या फ्लो मुळे पण रस्त्याची दुर्दशा झालेली दिसत होती . एका बाजूला लँड स्लाईड मुळे दुर्दशा झालेले पर्वत तर सतलूज च्या दुसऱ्या किनाऱ्यावर ऍपल च्या बागानी सजलेले पर्वत . किती विरोधाभास होता हा . गाडी जसजशी पुढे जात होती तसे हिमालयाचे अक्राळ - विक्राळ रूप दृष्टीस पडत होते . उंच उंच पर्वत आणि खाली प्रचंड वेगाने झेपावणारी सतलूज . भितीने गाळण उडण्यासारखी ही परस्थिती होती . पण काही ठिकाण ची सुंदरता ही मनाला ताजेतवाने करत होती . पिओ पासून पुढे गेल्यानंतर खारो पूल लागतो . खारो पुलाच्या जवळ सतलूज पूर्व पश्चिम वाहात येऊन दक्षिणे कडे वळसा घेते त्यामुळे या ठिकाणी खूप सुंदर दृष्य पाहावयास मिळते . शेजारच्या टेडीवर एक हॉटेल आहे , त्या ठिकाणाहून सतलूज आणि सतलूज व्हॅली चा लांब पर्यंत चा परिसर डोळ्यास शीतलता देऊन जातो . समोर आकाशाला गवसणी घालणारी हिमशिखरे आणि अवखळ पणे उंच उडत धावणारे सतलूज चे हिरवे पाणी . दक्षिणेला हिमशिखरांच्या बरोबरीने बहरलेली ऍपल ची शेती . एव्हढे सुंदर आणि नयन रम्य निसर्गाचे रूप मुक्त पणे अनुभवण्यासाठी या ठिकाणी थांबणे जरुरी आहे . आणि हि संधी आम्हाला आमच्या बस ड्राव्हर मुळे च मिळाली हे नक्की . बस ने खारो पुलाववर कुस बदलत हिरव्या बागांमधून धावू लागली . पिओ मधून ठंगी साधारणतः ईशान्य दिशेला आहे , पर्वत राजीला वळसा घालून मोरांग ब्रिज मार्गे ठंगी ला पोहचावे लागते .
SATLUJ RIVER , KAJA, TABO, RECONG PIO
SATLUJ RIVER , KAJA, TABO, RECONG PIO
बस ने कभी दाये तो कभी बाऐ करत मोरांग गाठले . मोरांग ब्रिज च्या खालच्या बाजूला ठंगी कडून येणारी नदी आणि सतलूज चा संगम आहे . मोरांग जवळ सतलूज पुन्हा उत्तर दक्षिण वाहिनी बनते . मोरांग ब्रिज वरून संगमा चे मनोमिलन अनुभवता येते . राष्ट्रीय महामार्ग सोडल्यानंतर मोरांग ब्रिज वरून पूर्वेच्या डोंगरात असलेला अतिशय अवघड घाट मार्ग पार करत आम्ही ठंगी मध्ये पोहचलो . दोन्ही पर्वताच्या मधोमध एका बेचक्यात नदी पासून खूप उंचावर वसलेले हे हिमालयीन खेडे . गाव खूप छोटे पण निसर्गाची मेहेरनजर लाभलेले . उत्तरेकडे कैलास शिखराची रांग आणि दोन्ही बाजूच्या पर्वतावर उंचा पर्यंत असलेली ऍपल ची शेती . गर्द वनराईने नाटलेला हा प्रदेश . डोळ्याचे पारणे फेडल्या शिवाय राहत नाही . नदीच्या पलीकडील भागातून गावापर्यंत माल वाहातुकी साठी टाकलेले रोपवे लक्ष वेधक ठरतात . आशे हे निसर्गाचा वरद हस्त लाभलेले ठंगी . आणि येथूनच चालू होतो किन्नोर च्या परिक्रमेचा मार्ग . आम्ही आज येथेच मुक्काम करून , उद्या सकाळी ट्रेक ला सुरुवात करणार होतो . त्यासाठी पुढील पाच दिवस लागणारे रेशन आणि इतर आवश्यक समुग्री खरेदी करून, स्थानिक पोर्टरसह पुढील प्रवास चालू होणार होता . पण दुर्दैव आड आले आणि माशी शिंकली . हिमालयाच्या वातावरणाचा खरा फटका आम्हाला या ठिकाणी बसला . स्थानिक लोकांकडून आणि पोर्टर कडून अशी माहिती मिळाली की ; चरांग पास ओपन नाही . कालच्या बर्फ बारी मुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बर्फ साठलेला आहे . त्या मुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही . ही बातमी ऐकून आम्हा सर्वांचे चेहरेच उतरले . या मधून काही मार्ग निघतो का याची चाचपणी केली , पुढे काही ठिकाणी फोन करून परस्थिती जाणून घेतली , पण उत्तर नकारार्थी मिळाले . सर्व बाजूनी एकच उत्तर मिळत होते , बरफ बहोत जादा हैं ! काही वेळ विचार केल्या नंतर अध्यक्ष विवेक तापकीर यांनी निर्णय घेतला , पुढे जाण्यात रिस्क असेल तर न गेलेले बरे . कारण या मोहिमे मध्ये माझ्यासह आजून चार गिर्यारोहक नवखे होते . शेवटी काळजावर दगड ठेवत माघार घेत ; छितकुल च्या बाजूने शिखर गाठण्याचे निश्चित केले . पण परतीच्या प्रवासाला खूप वेळ असल्यामुळे पुढचे चार दिवस प्लॅन बी प्रमाणे सतलूज आणि स्पिती व्हॅली एक्सप्लोअर करण्याचा निर्णय झाला . आणि आम्ही आमचा मोर्चा मोरांग कडे परतीच्या मार्गाने वळवला . मोरांग ते स्पिलो हा दहा कि मी चा ट्रेक पूर्ण करत आम्ही संध्याकाळच्या मुक्कामासाठी राष्ट्रीय महामार्गावरील स्पिलो या ठिकाणी पोहचलो . सतलूज च्या अगदी किनाऱ्यावर वसलेले हे छोटेसे गाव . मोरांग पासून पुढे हिमालयाचा तिसरा अंक सुरु होतो . प्रचंड मोठ मोठे उजाड डोंगर, दगड आणि वाळू च ते काय येथील वैशिष्ट्य . आणि काही तुरळक प्रमाणात दिसणाऱ्या सफरचंदाच्या बागा . थंडी ही तुलनेने कमी , अशा या सिप्लो मधला पहिला आणि हिमालयामधला चौथा मुक्काम ठरला .
काजा ला जाण्यासाठी खूप कमी बस ( फक्त दोन ) असल्यामुळे ४ मे च्या भल्या सकाळीच आम्ही निघण्यास सज्ज झालो . काही करून गर्दीची तमा न बाळगता बस पकडायची असा ठाम निश्चय मनाशी बांधूनच आम्ही बस ची प्रतीक्षा करत थांबलो . बस ही दुर्दशा झालेल्या रस्त्याची तमा न बाळगता वेळेत हाजर झाली . शिरकाव करण्या इतपत जागा मिळाली . त्यातच धन्यता मानत पुढचा प्रवास सुरु झाला . बस कंडक्टर च्या बोलण्यातून जाणवले कि आजचा संपूर्ण दिवस प्रवासात जाणार . संपूर्ण हिमालयाच्या प्रवासामध्ये अंतराचे आणि प्रवासाच्या वेळेचे गणित कधीच जमले नाही . आजचा दिवस ही त्याला अपवाद नव्हता . कारण स्पिलो ते काजा हे अंतर १६५ कि मी आहे , पण प्रवासाचा वेळ पहिला तर आठ तास . त्या मुळे फार विचार न करता रस्त्यामध्ये जे दिसेल ते डोळ्यात साठवत पुढे जायचे एव्हढेच आज ठरवले व खिडकीतून मनाला मोकाट बाहेर सोडून दिले . स्पिलो सोडल्या नंतर पर्वत खूप वेगळ्या प्रकारचे दिसत होते . पर्वतावर कोठेही मोठ मोठे दगड दृष्टीस पडत नव्हते , मुरूम आणि वाळूचे थर आणि त्यावर बर्फ आशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसत होते . फळ बागा कोठेही दिसत नव्हत्या . पुढे गेल्यानंतर पूह मध्ये काही ठिकाणी हिरवळ दिसली , पण ती ही आल्पजिवीच ठरली . आय टी बी पी कॅम्पला वळसा घालून खाली उतरल्यानंतर थोड्या अंतरावरती डबलिंग गाव लागते . हे गाव पाहिल्यानंतर मला महाराष्ट्रातील दुष्काळी खेड्याची आठवण झाली . प्रचंड ओसाड डोंगर कुठेही हिरवळ नाही . पण गावाच्या शेजारी थोडीशी हिरवी झुळूक दिसली , तेव्हडीच ती काय डोळ्याला शितलता . डबलिंग सोडल्यानंतर खऱ्या अर्थाने हिमालयातील वाळवंट चालू होते . अतिशय दुर्गम भाग , लांब लांब पर्यंत कोठेही गाव नाही की वस्ती नाही . फक्त वाळूचे डोंगर . सतलूज ही उथळ होत चालली होती . पाण्याचा प्रवाह काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मध्येच उधाण आलेला दिसत होता . रस्त्याला काही ठिकाणी गावची नावे असलेले फलक दिसत होते , पण गाव कोठे आहे ते मात्र कळत नव्हते . डबलिंग नंतर रस्ता पूर्ण उताराचा आहे . डोंगराची दाटी असल्यामुळे व्हॅली अगदी निमुळती होत गेली आहे . आणि रस्ता ही अतिशय छोटा व दुर्गम आहे . ज्या रस्त्याने पायी चालण्याची भिती वाटावी त्या रस्त्याने हे हिमालयीन वीर ड्रायव्हर गाडी चालवतात , खरोखरच ही शौर्याचीच गोष्ट आहे . एका डोंगराच्या चिंचोळ्या भागातून गाडीने पश्चिम दिशेला वळण घेतले ; त्या ठिकाणी उजव्या बाजूने पाण्याचा भला मोठा प्रवाह जोरात आवाज करत खाली येतो , तो पाण्याचा प्रवाह म्हणजे सतलूज नदी . या ठिकाणी खाब नावाचा एक फलक दिसतो , पण गाव दिसत नाही . आणि येथेच ! म्हणजे खाब या ठिकाणी सतलूज आपली साथ सोडते . तिबेट मध्ये मानसरोवर जवळ राक्षस ताल येथे उगम पावणारी लोगचेन खम्बाव पुढे चायना बॉर्डर बिनदिक्कत पणे पार करत सतलूज नाव धारण करून भारतात प्रवेश करते आणि संपूर्ण हिमाचल च्या बरोबरीने पंजाब आणि हरियाणा प्रांताला सूजलम् - सुफलम् करून पुढे पाकिस्थानला मैत्रीचा संदेश देत चिनाब ला जाऊन मिळते . आम्ही मात्र आता सतलूज ला प्रणाम करत , खाब येथील छोटासा संगम पार करून स्पिती ची साथ करत . अंगाचा थरकाप उडवणाऱ्या जगातील मोस्ट डेडलियस्ट रोड च्या यादीमध्ये पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवणाऱ्या रस्त्याने जीवनाचा थरार अनुभवत पुढे निघालो . भल्या मोठ्या पर्वतावरून नागमोडी वळणे घेत , पर्वताच्या दुसऱ्या अंगाला विसावलेल्या नाक्को मध्ये आम्ही पोहचलो . चोहीकडे फक्त वाळूचे भले मोठे पर्वत व त्यावर साठलेले बर्फ या मुळे रुक्ष पणात हि सुंदरता असते याची अनुभूती आली . आम्ही खूप उंचावर असल्यामुळे दूर पर्यंत दिसणारी बर्फ़ाच्छादित शिखरे मंदिराच्या कळसाप्रमाणे दिसत होती . पर्वत राजीच्या शिखरांचा आनंद लुटत असताना गाडी ने हेलकावे खात पर्वताचा तळ कधी गाठला ते कळलेच नाही . काही नागमोडी वळणे घेत आणि धुराळा उडवत गाडीने सुमडो गाठले . सुमडो हे गाव आहे की नाही हे मात्र कळाले नाही, पण त्या ठिकाणी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांचे चेक पोस्ट आहे . या ठिकाणी प्रत्येक वाहनांची नोंद करणे जरुरी आहे त्याच प्रमाणे इनर लाईन परमिट ( फक्त विदेशी पर्यटकांसाठी ) पण दाखवणे जरुरी आहे . रस्त्यामध्ये काही तरी आडथळा निर्माण झाल्यामुळे काही वेळ सक्तीची विश्रांती घ्यावी लागली . धुळीने माखलेल्या चेऱ्यावर पाण्याचा शिडकावा करून , या ठिकाणाहून जवळच आसलेल्या तिबेट बॉर्डर ( १३ कि मी ) वरून वाहात येणाऱ्या नदीच्या संगमावरती फेरफटका मारला . काही वेळातच बस ने सुमडो सोडले आणि सूर्याची कललेली किरणे तोंडावर घेत स्पिती व्हॅली मध्ये प्रवेश केला . आता पर्वतांची उंची कमी झालेली दिसत होती आणि दोन्ही डोंगराच्या मधील भूप्रदेश खूप जास्त प्रमाणात विस्तीर्ण झाला होता . विवेक सरांच्या म्हणण्यानुसार हिमालयातील वाळवंट चालू झाले होते . फक्त माती आणि वाळू चे भले मोठे ढिगारे एव्हडेच ते काय पर्वताचे अस्तित्व . पर्वतांच्या मधून वाहणारी भले मोठे पात्र असणारी स्पिती रिव्हर . नॅशनल हायवे फक्त नावालाच शिल्लक राहिला होता .रस्त्याची दुर्दशा पाहून वाटले , या रस्त्याला लवकरच पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मिळणाऱ्या निधिची गरज आहे . काही ठिकाणी तर रस्त्याचे अस्तित्व ही जाणवत नव्हते . पण पुढे काजा नावाचे गाव आहे , या एकाच आशेवर आम्ही पुढे निघालो होतो . आणि शेवटी बस ने प्रचंड धुळीचे लोट उडवत टॅबो मार्गे काजा गाठले . दोन्ही पर्वताच्या मधून वाहणाऱ्या स्पिती च्या किनाऱ्यावर वसलेले पण किह मॉनेस्ट्री मुळे प्रसिद्ध असलेले हे दीड - दोन हजार लोकसंखेचे काजा गाव . पारंपारिक थोडी फार शेती आणि पशुपालना सह पर्याटन हा येथील प्रमुख व्यवसाय . त्या मुळे येथे स्थानिका पेक्षा पर्यटकांची च जास्त गर्दी दिसत होती . रूम ही जास्त परिश्रम न करता लगेच मिळाली ; पण पाण्याची नासाडी न करण्याच्या आटीवरच .
काजा मध्ये थंडी खूप असल्यामुळे सकाळी जरा निवांतच तोंडावरचे पांघरून दूर केले . पाणी कमी वापरतच आवराआवर करून बॅग गाडीवर लोड केल्या . हिमाचल परिवहन च्या बस काजा च्या पुढे जात नासल्यामुळे आम्ही आज खाजगी वाहणाने प्रवास करण्याचे ठरवले . आज प्रवास जास्त नव्हता , कारण काजा च्या आसपास चा परिसर पाहून परत टॅबो मुक्कामी जायचे होते . नासुरुद्दीन शहा ला लाजवेल अशा थाटात तिरकी टोपी आणि डोळ्यावर रेबेन चा गॉगल लावून मोठ्या थाटातच ड्रायव्हर ने गाडी स्टार्ट केली . काजा वरून साधारणतः आठ कि मी वर किह मॉनेस्ट्री आहे . एक उंच टेकडी व्यापून केलेले विशिष्ट कलाकृतीचे सुबक आणि आकर्षक बांधकाम लक्ष वेधून घेते . पांढऱ्या आणि लाल रंगाची आकर्षक रंगरंगोटी मुळे किह मॉनेस्ट्री उठावदार आणि रुबाबदार दिसते . गाडी थेट मॉनेस्ट्री च्या दरात जाते . त्या मुळे थकवा वगैरे येण्याचा प्रश्नच नाही . समोरच्या भल्या मोठ्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आतल्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे .आणि समोर स्पिती व्हॅलीचा विस्तीर्ण भूप्रदेश . ज्या दरवाजातून आत आलो त्याच्या बरोबर वरच्या बाजूला आकर्षक सजावट करून निटनेटक्या पद्धतीने सजवलेला प्रार्थना हॉल आहे . या ठिकाणी ध्यान धारणा करण्या इतपत शांतता तुम्ही अनुभवू शकता . हंड्या , झुंबर , विशिष्ट प्रकारची तोरणे आणि पताका व प्रार्थनेसाठी केलेली बैठक व्यवस्था हे किह मॉनेस्ट्री चे खास वैशिष्ट्य मानायला हरकत नाही . प्रार्थना हॉल च्या वरती उजव्या बाजूने चढून वर गेल्या नंतर समोर एका खोली मध्ये बुद्धाची सुबक मूर्ती आणि त्या समोर केलेली सजावट मन प्रसन्न करून जाते . बाजूला बोटी भाषेतील धर्म ग्रंथ ची केलेली मांडणी आणि त्यांच्या वाचनासाठी केलेली बैठक व्यवस्था मनोहरी आहे . टॅबो मॉनेस्ट्री च्या नंतर म्हणजे साधारणतः अकराव्या शतकात हिची उभारणी झाली आहे असे येथील लाम्हा नी सांगितले . किह मॉनेस्ट्री चा इतिहास , परंपरा , मॉनेस्ट्री च्या माध्यमातून चालणारे धार्मिक उत्सव आशा अनेक विषयावर लाम्हा नी सर्वांना मंत्रमुग्ध केले . वैशिष्ट्य पूर्ण चहा च्या बरबरीने प्रसादा साठी सामूहिक पणे बनवत असलेल्या मोमो वर गप्पांची रंगलेली मैफील संपवत ; किह मॉनेस्ट्री च्या आठवणी ह्रदयात साठवत पुढे निघालो .
KIH MONESTRI, KAJA , CHANDRA TAL, TABO HIMACHAL
KIH MONESTRI, KAJA , CHANDRA TAL, TABO HIMACHAL
किह मॉनेस्ट्री पासून पुढे निघाल्या नंतर स्नो लेपर्ड साठी प्रसिद्ध असलेल्या चिच्चम च्या बाजूने एशिया खंडातील सर्वात उंच गाव असलेल्या किब्बर मध्ये पोहचलो . गावामध्ये प्रेक्षणीय असे काही नाही , पण गावाची भौगोलिक परिस्थितीच प्रेक्षणीय आहे . सर्वात उंच ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूची बर्फ़ाची शिखरे आपल्याच बरोबरीला दिसतात . आजूबाजूला संपूर्ण बर्फ पसरलेला दिसतो . पाठीमागच्या बाजूला निळ्या आकाशच्या पार्शवभूमीवर काही उंच हिमशिखरे शोभून दिसतात .आणि विशेष म्हणजे गावाची व घरांची रचना सुबक आहे . तेव्हा कधी काजा ला गेलात तर आळस न करता किब्बर ला जरूर भेट द्या . त्यानंतर खाली उतरून किह मॉनेस्ट्री ला वळसा घालून लांजा मार्गे कॉमिक ला जाता येते . कॉमिक ची उंची ४५८९ मी आहे आणि लोकसंख्या फक्त ११४ . कॉमिक पासून जवळच शिलापिक नावाचा पर्वत आहे . संपूर्ण बर्फ़ाच्छादित हे शिखर इतर शिखरांच्या माळेत मुगुट मण्या प्रमाणे शोभून दिसते . कॉमिक चे वातावरण खूप लहरी आहे . या ठिकाणी थोडे फार ढग जमा झाले की बर्फ बारी सुरु होते . ऑक्सिजन चे प्रमाण खूप विरळ असल्यामुळे त्रासाची शक्यता नाकारता येत नाही . कॉमिक मधील मॉनेस्ट्री चे बांधकाम साधे आहे पण विस्त्रत स्वरूपात आहे . आळंदी- पंढरपूर मधील धर्मशाळे प्रमाणे मॉनेस्ट्री ची रचना आहे . जोराचा वारा , प्रचंड थंडी आणि बर्फबारी सुरु झाल्यामुळे जास्त वेळ न दवडता आम्ही एशिया खंडातील टॉपेस्ट पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जाणारे हिक्कीम चे गाडीतूनच धावते दर्शन घेऊन अतिशय धोकादायक घाट रस्त्याने काजा कडे रवाना झालो . काजा मध्ये पाहाण्यासारखे विशेष काही नाही , पण खरेदी साठी काजा ला पर्याय नाही . तेव्हा थॊडी फार खरेदी करून आम्ही टॅक्सीनेच टॅबो च्या दिशेने रवाना झालो . दोन्ही बाजूला मातीचे पर्वत आणि त्यावर वारुळाच्या आकारचे नैसर्गिक नक्षी काम . हे तुम्हाला डोळ्यात साठवायचे असेल तर स्पिती व्हॅली ला पर्याय नाही . हरियाली मध्ये तर सुंदरता असतेच . पण कुठे ही एक झाड सुद्धा हिरवे दिसत नाही किंवा झाडच नाही तो परिसर सुंदर कसा आसू शकतो ? या वर कदापि विश्वास बसणार नाही . पण कुठे हि हिरवळ नाही , किंवा पाण्याचे स्तोत्र नाहीत तो परिसर पण खूप सुंदर आहे . तो म्हणजे स्पिती व्हॅली . प्रत्येक वळणावर तुम्हाला गाडी थांबवून मनमुराद फोटो खेचावेत आसाच हा स्पिती व्हॅली चा परिसर आहे . तेव्हा स्पिती ला शब्दात अडकून ठेवण्या पेक्षा डोळ्याचं कोंदण च केलेल बर ! काजा सोडल्या नंतर पुढे डाव्या बाजूला सात कि मी वर धनकर मॉनेस्ट्री आहे . आमच्या कडे थोडी वेळेची कमतरता असल्यामुळे धनकर मॉनेस्ट्री ला न जाता सरळ टॅबो गाठले . पण धनकर मॉनेस्ट्री चे फोटो इंटरनेट वर चाळले असता खूप मोठी चूक केल्याचे जाणवले . तेव्हा स्पितीला गेला तर धनकर मॉनेस्ट्री पण आवश्य पहावी . टॅबो सुद्धा काजा प्रमाणेच स्पिती नदीच्या तिरावर डोंगराच्या कुशीत थोडी फार पाय पासरण्या इतपत जागा पाहून वसलेले आहे . टॅबो चे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी १०५० वर्षा पूर्वीची जुनी मॉनेस्ट्री ‘ जशी आहे तशी ’ जतन करून ठेवली आहे . मॉनेस्ट्री चा परिसर खूप मोठा आणि सुंदर व स्वच्छ आहे . संपूर्ण बांधकाम मातीचे आहे . आपल्या कडील सह्याद्रीच्या कडक पाषाणा मधील रांगड्या गड कोटांची अवस्था पाहून , ही मॉनेस्ट्री १०५० वर्षा पूर्वीची असेल असे वाटत नाही . पण पाहिल्यावर विश्वासच ठेवावा लागतो , हे नक्की . मॉनेस्ट्री च्या बाहेरील बाजूला बौद्ध स्थापत्य कलेचा नमुना असलेले स्तूप दिमाखात उभे असलेले दिसतात . मध्यभागी जिवापाड जतन केलेली वास्तू आपल्या कणखर पणाचे दर्शन घडवते . आज ही त्या ठिकाणी तितक्याच उत्साहाने प्रार्थने सह सर्व कार्यक्रम पार पडतात . मॉनेस्ट्री देखणी , सुबक , सुंदर व स्वच्छ जरी असली तरी भव्य दिव्य नाही , म्हणूनच की काय त्याच्याच शेजारी एका नवीन मॉनेस्ट्री चे काम चालू आहे . नवीन मॉनेस्ट्री च्या हॉल मध्ये बुद्धाची प्रचंड मोठी मूर्ती ध्यान मुद्रे मध्ये विराजमान झालेली आहे . हॉल मधील लाकडावरचे सुबक नक्षी काम आणि तेव्हढीच आकर्षक पेंटिंग मनाचा थकवा घालवते . डाव्या बाजूला विविध पताकानी आणि प्रेयर व्हील ने सजवलेले सोनेरी स्तूप महणजे आधुनिक बांधकाम शौलीचा उत्कृष्ट नमुनाच . मॉनेस्ट्री पाहत असताना डाव्या बाजूच्या डोंगरावर काही गुफा दिसतात . त्यांचा इतिहास कळला नाही . पण असे जाणवते की पूर्वीच्या काळी मॉनेस्ट्री च्या दर्शनासाठी येणाऱ्या लाम्हा च्यां निवासाची सोय म्हणून या गुफांची निर्मिती झाली असावी . काही वेळ डोंगरावर चढून गेल्यानंतर गुंफा पर्यंत पोहचता येते . गुंफा ची खुप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली दिसते . गुंफा शेवटच्या घटका मोजत आहेत असेच जाणवते . मॉनेस्ट्री च्या तुलनेत या गुंफा कडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे जाणवते . मॉनेस्ट्री पाहून प्रसन्न झालेले मन गुंफा पाहून खिन्न झाल्याशिवाय राहत नाही . आशाच खिन्न मनाने खाली उतरत स्पिती व्हॅली तील दुसऱ्या दिवसाच्या विश्रांती साठी मॉनेस्ट्री विश्वस्त मंडळाने उभारलेल्या यात्रेकरू निवासामध्ये दाखल झालो .
1050 YERS OLD TABO MONISTRI, TABO, NAKKO, RECONG PIO
1050 YERS OLD TABO MONISTRI, TABO, NAKKO, RECONG PIO

टॅबो माझ्या कायम स्मरणात राहील ते माझ्या मानदुःखी मुळे . माझ्या मानेने आणि पाठीने मला चांगलाच इंगा दाखवला . त्याचे झाले आसे रात्री झोपल्यानंतर साधारणतः दोन वाजता जाग आली ती मानेमध्ये होत असलेल्या वेदनांमुळे , आंथरुणातच बसून थोडा व्यायाम केला पण आसर दिसत नव्हता . आणि त्या मध्ये लाईट गेल्या मुळे प्रथोमपचार पेटी पण सापडत नव्हती आणि कोण कोठे झोपले आहे ते ही कळत नव्हते . शेवटी विवेकला आवाज देऊन उठवले आणि मोबाईलच्या प्रकाशात मानेला नितीन ने दिलेल्या तेलाची मॉलिश करून एक पेन किलर घशात घातली . पण टॅबो स्मरणात राहायचे होते म्हणून की काय पण दुःखने रात्रभर कमी झालेच नाही . शेवटी सकाळी “ दुखऱ्या मानेला बॅग चा आधार ” असे म्हणत पाठीवर बॅग टाकून सकाळच्या कोळया उन्हात न्हाऊन निघालेल्या मॉनेस्ट्रीचे चांगले दोन - चार फोटो मोबाईल मध्ये घेतले आणि नाक्को च्या दिशेने रवाना झालो . आजचा दिवस ही प्रवास मय होणार यात शंका नव्हती . कारण आज होता होईल तेव्हढे आंतर पार करून सांगला व्हॅलीत घुसायचेच असे ठरले होते . त्या मुळे बस ची वाट न पाहता रोड वर उभे राहून काजा वरून परतणाऱ्या खाजगी वाहनांना लिफ्ट मागायची , नाही तर शेवटी बस आहेच . या इराद्याने बस अड्डा सोडून रोड गाठला . आणि शेवटी एका सुमो ने आम्हाला लिफ्ट दिलीच . आजचा प्रवास सुखकर आणि लवकरच आंतर पार करून आपण सांगला मध्ये पोहचणार या खुशीतच पुढचे बेत आखत आणि काही वळणावर थांबून फोटो काढत नाक्को च्या चढणीला लागलो . सरळ चढाव आणि आवघड वळणे घेत पर्वताच्या माथ्यावर विसावलेले नाक्को मध्ये प्रवेश केला . चालकाला थोडी विनंती वजा मस्का लावत नाक्को मध्ये आर्धा तास थांबण्याची विनंती केली . तेव्हा त्याने ही आढे वेढे न घेता बात मान गई । नाक्को हे रुक्ष वाळवंट वजा पर्वतावर वसलेले छोटेसे खेडे . कोठे ही हिरवळ नाही की बाग नाही , बटाटा हे मुख्य पीक , त्या साठी तयार केलेली डोंगर उताराची शेती अन् शेती साठी बनवलेले दगडांचे बांध अंगणात रांगोळी काढल्या सारखे दिसत होते . नाक्को चे वैशिष्ट्य म्हणजे एव्हढया उंचावर आणि चॊह बाजूनी बर्फ़ानी वेढलेला परिसर असताना देखील येथे गावाच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याला वाळलेल्या पण टोकदार वृक्षां च्या वेढ्यात एक शानदार झील ( छोटासा तलाव ) आहे .
TABO, NAKO ZEEL, SHIVAJI
TABO, NAKO ZEEL, SHIVAJI
तलाव छोटा आहे, पण त्याच्या बाजूने पर्यटनाच्या दृष्टीने बांधलेला घाट , आणि निळ्या आकाशाच्या पार्शवभूमीवर गर्वा ने मान उंच करून उभी असलेली हिमशिखरे, अन् त्यांच्याच पायाशी पर्णझडी च्या विळख्यात सापडलेल्या वृक्षा च्या मधोमध हिरव्यागार पाण्याची झूल अंगावर लपेटलेला नाक्को झील . निसर्गाच्या रंगसंगतीमुळे शोभून दिसतो . खरे तर एखाद्या निसर्ग कवीला हे ठिकाण सापडले तर त्याच्या शब्दानां धुमारे फुटल्या विना रहाणार नाहीत . अतिशय तेजोमय आणि सुंदर ठिकाण , निसर्गाच्या झोळीतून पडलेले रत्नच जणू . फार वेळ नसल्यामुळे घाई - घाई च या परिसाला स्पर्श करून , माहेर सोडून सासरला निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे मी मान उंच करून झील पुन्हा दृष्टीस पडतो का ? हे पाहतच पुढे निघालो . पुन्हा एकदा पर्वताच्या टोकावरून पलीकडच्या दरीत उतरून खाब जवळचा धोकादयक रस्ता पार करत डबलिंग , पूह मार्गे स्पिलो च्या थोडे पुढे पोहचलो असेल तो रस्त्यावर गाड्यांची रांग दिसली . चौकशी अंती कळाले की ; पुढे मोठ्या प्रमाणात लँड स्लाईड झालेले आहे . समोर फक्त धुराळा उडतानाच दिसत होता . ढिगारे हटविण्याचे काम चालू आहे , कि पुन्हा लँड स्लाईड होत आहे हे कळत नव्हते . जास्त फड फड न करता शेजारच्या एका दगडावर भसकन मारली ती पुढचे दोन अडीच तास . बी आर ओ च्या टीम ने जीवावर उदार होत काही तासात रस्ता वाहातुकीसाठी खुला केला . त्यांचे काम पाहून , इंडिया मे भी ऐ हो सकता हैं ! असा प्रश्न ड्रायव्हरला विचारला तर त्याने हां क्यूँ नही ! ये तो पाहाडी इलाके की ताकत हैं ! असे म्हणत मला दूर फेकले . मनात म्हटले आपल्या कडे वर्षानुवर्षे रस्त्यावर पडलेल्या खड्डयांकडे डोळे झाक करून पुढे जाणाऱ्या , पण रस्त्याचा सोडून स्वतःचा विकास करणाऱ्या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना इकडे बढतीवर पाठवले पाहिजे . बी आर ओ च्या टीम ला शतशः धन्यवाद देत आम्ही मोरांग मार्गे पिओ ला न जाता डोंगराच्या पायथ्याला थांबलो ते करच्छम कडे जाणाऱ्या बस ची वाट पाहत . निसर्गाने पुन्हा रंग बदला होता सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या प्रचंड लोटा मध्ये आम्ही सापडलो . समोर काही दिसत नव्हते, काय करावे सुचत नव्हते . एका ट्रकच्या आडोश्याला उभा राहून देवाचा धावा करण्यास सुरुवात केली , पंधरा - वीस मिनिटाच्या वादळी तडाख्या नंतर टपोऱ्या थेंबानी आम्हाला घेरले . पुन्हा काही वेळ एका टपरी वजा हॉटेलचा आसरा घेऊन पाऊस उघडण्याची वाट पाहू लागलो . एका मोठ्या सरीनंतर पाऊस उघडला आणि तेव्हढयात रकच्छम ला जाणाऱ्या बस चे ही आगमन झाले . एका पायावर जागा मिळवत करच्छम गाठले , करच्छम वरून पूर्वेकडे जो रस्ता जातो तो सरळ सांगला व्हॅलीत . हिरव्या वृक्षांनी आणि सफरचंदाच्या बागांनी वेढलेले सुंदर पर्वत त्या वरून खळाळणारे अवखळ निर्झर अन् बर्फासह धुक्यांनी वेढलेली शिखरे , नागमोडी वळणे घेत व्हॅली च्या बेचक्यात वसलेल्या टुमदार गावात लुप्त होणारा रस्ता . दोन्ही पर्वताच्या मधून फेसाळत वाहणारी बास्पा नदी . हे सुंदर चित्र स्वर्गातले नसून बास्पा अर्थात सांगला व्हॅली चे आहे . क्षेत्रफळाने खूप छोटी असलेली ही व्हॅली सुंदरतेत कोहिनूर ठरते . करच्छम जवळचा लोखंडी पूल ओलांडून बास्पा व्हॅलीत प्रवेश केल्या बरोबर निसर्गाचे हिरवे रूप डोळ्यात भरते . करच्छम पासून सांगला हे खूप उंचावर असल्यामुळे बस ने काही कळायच्या आत स्वर्गाचा रस्ता धरला . सांगला ला जाण्यासाठी खूप आवघड आणि फार उंचा वरून रस्ता आहे . खाली नदी कडे दृष्टी गेल्या क्षणी डोळ्याच्या बाहुल्या गरगरल्या शिवाय रहात नाहीत . त्या वर एकच उपाय शिट बदलून डोंगराच्या बाजूला मान खाली घालून , जीव मुठीत धरून बसने . प्रचंड उंची आणि जीवघेणी वळणे . संपूर्ण हिमालयात माझे तारे चमकावणारा हा एकमेव रस्ता . एक च गोष्ट ती काय चांगली , ती म्हणजे रास्त्याची सुस्थिती . देवाचा धावा करतच सांगला गाठले . पण सांगला मध्ये आल्या बरोबर नक्की स्वर्गात आल्याचा आनंद मिळतो . निमुळती व्हॅली आता विस्तीर्ण होत जाते आणि सुंदरतेला उधाण येते . एका बाजूला किन्नोर कैलासच्या हिमशिखरांची पर्वत रांग आणि दुसऱ्या बाजूला हिरव्या रंग संगतीने नटलेली हिमशिखरे , आणि मध्ये ; कधी संथ पणे तर कधी नवयौनातल्या तरुणी सारखी अवखळ वाहणारी बास्पा . आकाशाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या वृक्षाची रांग तर , हिमालयाच्या शिरपेचात खवलेले तुरेच जणू . असे हे दृश्य पाहिल्या नंतर ‛ राम तेरी गंगा मैली च्या दृष्याची आठवण झाल्या खेरीज राहत नाही . विस्तीर्ण हिरवळीच्या गालीच्यावर वसलेल्या गावातून अलगद पणे कुठून तरी निघणारा धूर रंगमंचावरील प्रेम गीताच्या वेळी सोडलेल्या धुराची जाणीव करून देतो . सांगला व्हॅली पाहिल्या नंतर वाटते , निसर्गाची झोळी तर या ठिकाणी फाटली नसेल . निसर्गाच्या या बेधुंद लहरीवर स्वार होऊन , डोळे बंद करत नाकाचा शेंडा वर करून बास्पा मधून निघणाऱ्या सुगंध लहरीवर तरंगत रकच्छम मध्ये पोचलो . रकच्छम कडाक्याच्या थंडीने गारठून गेले होते . उशीर झाल्यामुळे हॉटेल मिळणे दुरापस्तच . फार वेळ न घालवता जेवणाची व्यवस्था केली आणि एका टीम ने रेस्ट हाऊस च्या मैदानातच टेंट उभे केले . कडाक्याची थंडी , अंगाला झोंबणारा वारा आणि बास्पा चा खळखळणाऱ्या आवाजावर शिणलेल्या शरीराला कधी पेंग लागली ते कळलेच नाही .
कडाक्याच्या थंडी मुळे आज उठण्याचे मन करत नव्हते , पण टेंट रेस्ट हाऊस च्या समोरच असल्यामुळे जास्त वेळ झोपणे पण योग्य नव्हते . आढे - वेढे घेतच स्लिपिंग बॅग मधून बाहेर पडलो , पण आखडलेल्या शरीरानेच . हाताची घडी घालून कुडकुडत बाहेर पडलो तेव्हा समोरचे दृष्य पाहून डोळे विस्फारत तोंडाचा चंबू करून पहातच राहिलो . धुक्यात हरवलेल्या उंच - उंच देवदार वृक्षां च्या पलीकडे बर्फ़ाळलेल्या शिखरावर सोन्याचा सडा शिंपला आहे की काय असेच वाटले . पर्वातची खालची बाजू आजून अंधारातच होती , पण शिखरांवर झालेल्या सूर्य किरणांच्या वर्षावाने बर्फ़ाचे सोने झाले होते . चारही बाजूने बर्फ़ाछादीत शिखरांना वेढलेले रकच्छम अजून पुरते जागे ही झाले नव्हते . बास्पा च्या अवखळ पणे वाहणाऱ्या पाण्याचा धो धो आवाजाला छेद देत वृक्ष राजी मधून उठणाऱ्या सुमधुर आवाजानी मी मात्र भल्या सकाळीच मंत्रमुग्ध झालो होतो . जास्त वेळ न दवडता भल्या सकाळीच उन्हाची कोवळी किरणे अंगावर झेलत आम्ही छितकुल च्या दिशेने रवाना झालो . रकच्छम ते छितकुल हे दहा कि मी चे आंतर मी सैराट होत उघड्या जिप्सी मध्ये उभा राहून हातातल्या हँडीकॅम ने अधाशा सारखे चित्रीकरण करत राहिलो . निसर्गाच्या या बेधुंद रूपा पुढे “ ना थंडी चे भान तोल सावरण्याचे त्राण ” तरी ही वेड्यासारखे धावत्या वर्णना सह चित्रीकरण चालू होते . देवदार वृक्षांचे घने जंगल , अन् त्या मधून वाट शोधणारा रस्ता आणि मधेच शिखरावरून कोसळत येणारा पाण्याचा भला मोठा प्रवाह . त्या वरून रस्त्याने घेतलेले पूल रुपी उड्डाण . वा ... वा ... किती सुंदर , किती नयनरम्य ! मनात म्हटले चार डोळे असते तर ; मेमरी फुल होई पर्यंत नसते का साठवता आले ? दोन वळणे घेऊन पुढे गेल्या नंतर पर्वातच्या सावल्याना मागे हाटवत सूर्याची किरणे वृक्षराई मध्ये चौफेर पसरली होती . लुकलुकणाऱ्या किरणां बरोबर शिवणा पाणी खेळत आम्ही डोंगराच्या कुशीत लपलेल्या छितकूल मध्ये पोहचलो . साधारणतः सकाळचे आठ वाजले असतील गाव अगदी शांत होते , कुठेही लगभग कींवा हालचाल जाणवत नव्हती . बस स्टॉप ला कोणीही व्यक्ती नव्हती . पण बस स्टॉप वर एक फलक मात्र दिमाखात झळकत होता . “ हिंदुस्थान का आखरी ढाबा ” . मला काही उमगेना , असे कसे हे नाव ? मी थोडा संभ्रमात पडलो . शेवटी जास्त विचार न करता माणसे शोधू लागलो . गाव आहे ढाबा आहे तर माणसे कुठे गेली . तेव्हढयात समोरून अंगावर उबदार जॅकेट लपेटलेली एक व्यक्ती आमच्या दिशेने येतांना दिसली . धाडस करून पुढे जात विचारले , ये ही छितकूल हैं ! हाँ जी ये ही छितकूल हैं । आगे कोई भी गाँव नही हैं । और यँहा से आगे चायना बोर्डर चालू होती हैं ! आणि मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला . ढाब्या ला नाव देणाराचे चरणस्पर्श करावे , नव्हे नव्हे त्याच्या पादुका डोक्यावर घेऊन च पुण्याला परतावे . पुढे दोन दिवस ढाब्या कडे फेऱ्या मारल्या पण ढाबा काही उघडला गेलाच नाही आणि शेवटी त्या महान व्यक्तीचा सहवास काही केल्या लाभला नाही . जास्त घाई गडबड न करता फलका शेजारीच एका दगडाचा आधार घेत , गोठवणाऱ्या थंडीत ही खळाळणाऱ्या बास्पा नदीचे भक्ती गीत ऐकत , चौफेर पसरलेल्या हिमशिखरांवरती सूर्य किरणांनी रेखाटलेल्या विविध रंगी छटांचे कॅनव्हास न्याहळण्यात दंग झालो . हिमालयाच्या उतुंग शिखरांनी चारही बाजूने वेढलेला हा निसर्गरम्य परिसर पर्वताच्या एका कोपऱ्यात वसलेलं टुमदार छितकूल . शेजारून अवखळ पणे खळाळत वाहणारी जिवदायिनी बास्पा . त्याच्या पलीकडे बर्फाच्या ओझ्यानी वाकलेल्या हिमालयाची प्रचंड मोठी रांग . याच रांगेतून पुढे गंगोत्री ला रस्ता जातो . ( पक्का नव्हे , ट्रेकिंग रूट ) पायथ्याला विविध पशू पक्षांना अंगा खांद्यावर खेळवत दिमाखात उभे आलेले दैदिप्य मान देवदाराचे वृक्ष . त्याच्याच शेजारी जीवदायी बास्पा च्या सानिध्यात अंग चोरून दाटी वाटीने उभ्या असलेल्या सफरचंदाच्या बागा . एका बाजूला हिरवीगार वनराई , अन् दुसऱ्या बाजूला दगडांनी आणि काट्याकुट्यानी व्यापलेली जागा . पण त्यात ही जागा शोधात यॉक च्या मदतीने फुलवलेली शेती . हिमालयातील इतर गावांपेक्षा हे गाव रंगी बेरंगी नव्हते . गाव होते पूर्ण लाकडी बांधणीचे . छितकूल बद्दल उत्सुकता जास्त ना ताणता बॅग घेऊन हॉटेल च्या दिशेने निघालो . नेहमी प्रमाणे जास्त प्रयास न करता हॉटेल मिळाले . पुढचे दोन दिवस या ठिकाणी मुक्काम आसल्या मुळे आम्ही सर्वजन आज फक्त आराम करण्याच्या मूड मध्ये होते , आणि घडलेही तसेच . मात्र दुपार नंतर खूप थंडी जाणवायला लागल्या मुळे कललेली उन्हें अंगावर घेण्याच्या हेतूने बाहेर पडलो . गावातून पुढे सरळ गेल्यानंतर डोंगराच्या कडेनी आणि बटाट्याच्या शेतीतून वळणे घेत जाणार रस्ता पुढे थेट तीन कि मी वर असलेल्या आय टी बी पी च्या पोस्ट पर्यंत पोहचतो . पुढे जाण्यास परवानगी नसल्या मुळे परतीचा मार्ग धरला . रस्त्याने परत न येता नदी मार्गा ने परत आलो . पूर्वेकडे तिबेट च्या बाजूला उगम पावणारी बास्पा अगदी उधळत तरी खिदळत तर मध्येच गाणी गात वाहते . इतर नद्यांच्या तुलनेने बास्पा चे पात्र खूप विस्तीर्ण आहे . पांढऱ्या शुभ्र दगड गोट्यानी भरलेली बास्पा विजनिर्मितीत सुद्धा अग्रेसर आहे . सांगला व्हॅली ला पावन करत , पुढे बास्पा करच्छम जवळ सतलूज ला जाऊन मिळते . आशा या बास्पा ची सफर करत आम्ही पुन्हा रमणीय छितकूल मध्ये पोहोचलो . गावा मध्ये पर्यटकांची वर्दळ जाणवत होती . रस्त्याच्या कडेची सर्व हॉटेल पर्यटकांच्या गर्दीने ओसांडून वहात होती . कदाचित सकाळी शांत वाटणारे छितकूल पर्याटक आल्या नंतरच जागे होत असावे . येथे येणाऱ्या बाहेरील पर्यटकांच्या तुलनेने स्थानिक पर्यटकांची गर्दी जास्त जाणवत होती . सूर्य मावळतीच्या दिशेने डोंगराच्या आड गेला होता . उन्हाची जागा गारठवणाऱ्या सावलीने घेतल्या मुळे अंगाला झोंबणारा वारा आणि रक्त गोठवणारी थंडी आक्रमक झाली . मी मात्र छितकूल एक्सप्लोअर न करता सरळ हॉटेल कडे धूम ठोकली . गोठवणाऱ्या थंडीत ही पोटाकडे लक्ष जाणे स्वभावीक , गेले आठ दिवस पराठे , थूप्पा , मोमोज , चोमीन , आणि राजमा ची भाजी खाऊन उबग आला होता . तेव्हा “ आज कुच्छ तुफानी हो जाये ” या उक्ती प्रमाणे हॉटेल च्या मालकीण बाईंना विनंती करून किचन चा ताबा आमचे अष्टपैलू गिर्यारोहक श्री. दिगंबर सुरजूसे यांचे कडे दिला . आणि क्या बात ! दिगंबर ने ही कोल्हापूर पध्दतीची मटण भाकरी बनवली . दिल खुश होत जेवणावरती आडवा हात मारला .
आज ८ मे घर सोडून दहा दिवस झाले होते ; घराची ओढ लागली होती , पण आजचा दिवस आमच्या साठी खूप महत्वाच होता . राहिलेले स्वप्न अर्धवट की होईना पण प्रत्यक्षात येणार होते . सकाळी लवकरच उठून आवरा आवर केली . गावाला विभागणाऱ्या अन् आपल्या खळखळणाऱ्या रुपाने सर्वाना मोहित करणाऱ्या ओढ्याची संगत करत ललांती पास चा रस्ता धरला . रस्त्यावरतीच गावाचे वैभव असलेल्या छितकूल देवीचे मंदिर आहे . लाकडाचे हे मंदिर खूप सुबक आणि सुंदर आहे . देवीच्या शौर्याची जाणीव करून देत दारामध्ये मध्ये दोन आक्रमक सिहांच्या मूर्ती आहेत . पाठीमागे नक्षी काम केलेला दरवाजा आणि आत छितकूल मातेची सुबक मूर्ती. समोर अखंड पणे तेवत असणारा दीप . बाजूला लकडामधून बनवलेल्या एका छोट्या टपरी वजा घरातून सतत लयबद्ध सुरात अखंड पणे घंटा नाद चालू होता . मंदिरात ना आरती ना कुणाची लगभग घंटेचा नाद कसा काय चालू ! म्हणून मी तिकडे डोकावलो ; पाहतो तर काय आश्चर्य , घंटा चक्क पाण्याच्या प्रवहा वरती सतत वाजत होती . नामांकित अभियंत्याला भूरळ पाडेल असे टेक्निक . ओढ्याचे गतिमान पाणी एका छोट्या पाईप मधून आणून, घंटा घराच्या खालच्या बाजूला असलेल्या चक्राच्या पत्त्यावर सोडून त्या द्वारे चक्रावर लावलेला शॅप्ट फिरवला जातो . त्या शॅप्ट ला लावलेल्या ठोकळ्याच्या साह्याने घंटेचा दोलक हलवला जाऊन क्षणा क्षणा ला घंटा नाद येत राहतो . या तंत्रज्ञाना वर खुश होत ओढ्याच्या कडेने पुढे गेलो . आणि एक तंत्रज्ञान दृष्टीस पडले . ओढ्याचे पाणी काही प्रमाणात वळवून ते ४५° मध्ये एका पाईप मधून झोपडीच्या खालच्या बाजूला असलेल्या चक्रावर सोडून त्या द्वारे धान्य दळण्याचे भले मोठे जाते फिरवून त्या द्वारे संपूर्ण गावचे अखंड पणे दळण दळले जात होते . खळाळणाऱ्या आवाजाच्या बरोबरीने जात्याची घरघर ऐकून आम्ही सर्व जण अक्षरशः तोंडात बोट घालून आवक झालो . अजून काही नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल का ? या उद्देशाने मी थोडा पुढे सरसावलो . ओढया मध्ये असंख्ये पाईप आंथरलेले दिसत होते . हे पण काही तरी वेगळे असणार म्हणून पाईप च्या दिशेने वर निघालो , ओढया मध्ये छोटे छोटे बांध घालून त्या खाली हे पाईप बसवले होते . काही ठिकाणी बांध घालण्याच्या ऐवजी प्लास्टिक चे डब्बे वापरून पाणी साठवले जात होते . हेच पाणी गुरुत्वकर्षणाच्या सिध्दांताचा वापर करून प्रत्येक घरापर्यंत पोहचवले होते .खूप साधे सोपे टेक्निक वापरून गावचे कल्याण नव्हे नव्हे स्वयंस्पुर्तीच्या दिशेने पुढे जाण्याचा जणू हा राजमार्गच. बास्पा च्या बरोबरीने कैलास शिखराच्या रांगेतून खळाळत येणारा हा ओढा खऱ्या अर्थाने छितकूल गावाची जीवनदायी ठरलेला आहे . छितकूल वासी आभियंत्यांचे मनापासून कौतुक करत आम्ही ललांती पास कडे जाणाऱ्या राजमार्गाने डोंगराच्या चढणीला लागलो . छितकूल च्या उत्तरेकडील डोंगरावर चढण घेतल्यानंतर रस्ता पूर्वेकडे वळून खाली जाऊन पुन्हा वर येतो . त्या मुळे आम्ही त्या रस्त्याने न जाता काही ठिकाणी दगडाच्या केन्स ( लगोरी ) उभ्या केल्या होत्या तो मार्ग निवडला . मार्ग खूप खरतड होता , सरळ उभी चढण आणि भल्या मोठ्या आकाराचे दगड . त्या मधून वाट काढत आम्ही मार्गक्रमण करत होतो . दोन्ही दगडाच्या मध्ये काही ठिकाणी खूप अंतर असल्यामुळे उडी मारून गेल्या शिवाय पर्याय नव्हता . दगडाच्या खाली आणि मधल्या गॅप मध्ये खूप प्रमाणात बर्फ साठलेला होता . त्या बर्फा मधून वाट काढत आम्ही पुढे सरकत होतो . थंडी आणि गार वाऱ्या मुळे तापलेले शरीर सुद्धा गार पडले होते . पण थंडीची आणि वाऱ्याची तमा न बाळगता “ शिखर फाऊंडेशन ” च्या ब्रीद वाक्याला ( conquering peaks ) सजेसी चढाई करत एका पाठोपाठ तीन शिखरे पार करत आम्ही ललांती पास च्या दिशेने निघालो . आम्ही साधारणतः ४८०० मी उंचीवर असल्यामुळे चालतेवेळी दम लागत होता , पण पाठीवर बॅग नसल्या मुळे जास्त थकवा जाणवत नव्हता . काही आंतर पुढे चालून गेल्यानंतर समोर अनेक उंच उंच शिखरांची रांग दिसू लागली . निळ्या आकाशाच्या पार्शवभूमीवर पांढरी शुभ्र शिखरे अजूनच शोभून दिसत होती . मधूनच तरंगत येणारे पांढरे ढग शिखरांच्या कानात भुंग्या प्रमाणे गुणगुणत पुढे जात होते . चॊहबाजूनी अनेक शिखरे आपल्या रुपाने भुरळ घालत होती . असे हे अनुपम रूप डोळ्यामध्ये नव्हे हृदयाच्या कप्या मध्ये साठवत पुढे मार्गक्रमण चालू होते . छितकूल खूप पाठीमागे पडले होते त्यामुळे इकडे फक्त बर्फ आणि बर्फ च दिसत होता . मध्येच लँड स्लाईडचा आवाज ही कानावर पडत होता . शेवटी आम्ही नवाबी थाटात पास पर्यंत पोहचलो . चोही कडे जिकडे तिकडे बर्फ च बर्फ . थोड्या वेळच्या विश्रांती नंतर आसपास चा परिसर न्याहळत आणि धमाल करत टीम ने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेल्या सैराट चित्रपटातील गाण्यावर छिंगाट होऊन धमाल डान्स करत हिमालयीन मोहिमेचा आनंद साजरा केला . आणि नागराज मंजुळे च्या सैराट ला हिमालयातील ५१०० मी विक्रमी उंचीवर प्रमोट करण्याचा मान मिळवला . आम्ही हा अनुपम आणि अनमोल ठेवा आधुनिक तंत्रज्ञाना च्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे . आपण ही खाली दिलेली लिंक ओपन करून त्याचा आनंद लुटू शकता . https://youtu.be/rc6WPPKgolQ . झिंगाट च्या गाण्यावर नाचून सैराट झालेली टीम पुन्हा बर्फ़ातून आणि भल्या मोठ्या दगडातून तोल सावरत उतरणीला लागली . अडीच तीन तासाच्या उतरणीनंतर सर्वजण सुखरूप हॉटेल वर पोहचले .
KINNOUR KAILAS, RECONG PIO , SATLUG , BASPA VALLIY
KINNOUR KAILAS, RECONG PIO , SATLUG , BASPA VALLIY

दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटेच छितकूल वरून सुटणारी बस पकडून आम्ही रकच्छम , सांगला मार्गे व्हॅलीतील डोंगर उताराचा थरार अनुभवत आणि सांगला व्हॅलीतला हिरवा निसर्ग कॅमेऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न करत करच्छम कडे प्रयाण केले . करच्छम ला गाडी बदलून आम्ही पुढे ज्युरी कडे निघालो . पुन्हा सतलूज ची कास धरत कधी नदीतील ओबड दोबड तर कधी अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घाट रस्त्याचा थरार अनुभवत दुपारी साडे बारा च्या दरम्यान ज्युरी या ठिकाणी पोहचलो . सतलूज च्या किनाऱ्यावर वसलेले , शिमला - रेकाँगपिओ मार्गावरील रामपूर नंतरचे हे मोठे गाव . देशाच्या सीमेचे रक्षण करण्या सदैव तत्पर असलेल्या आर्मीचे सेंटर अशी ही ज्युरी ची ओळख . ज्युरी चे आणखी एक वैशिष्ट्य ; गावाच्या पूर्वेला अगदी हाकेच्या अंतरावर ऊनू महादेव मंदिर आहे आणि याच मंदिराच्या पाठीमागे डोंगराच्या कुशीत गरम पाण्याची कुंड आहेत . गाडीतून उतरल्या बरोबर थेट गरम पाण्याच्या कुंडाचा रस्ता धरला . आर्मी ऑफिस च्या समोरून जात असताना , पाठीवरील ट्रेकिंग शॅक पाहून आर्मीच्या एका जवानाने आम्हाला उत्स्फुर्त पणे सॅल्यूट घातला तेव्हा माझी छाती अभिमाने ५६ इंच फुगली . मी ही त्याच जोशात कधी काळी एन सी सी च्या परेड मधील गाठीशी असलेल्या अनुभवाचा बेछूट वापर करत जोशपूर्ण सॅल्यूट ठोकला . वीरश्री नी भरलेल्या डोळ्याची नजरा नजर होऊन स्मितहास्य वदनाने दोघेही ताडताड निघून गेलो . रोडच्याच उजव्या बाजूला निसर्गाच्या कुशीत गरम पाण्याचे कुंड लागतात . मंदिरात चालू असलेल्या भजनावर गुणगुणतच कुंड गाठला . पाण्यालाच काय माणसाला ही गोठावणाऱ्या थंडीत ; हिमशिखरांच्या अगदी पायथ्याला , तुडुंब भरलेले कुंड वाफळलेल्या पाण्याने ओसांडून वाहात होते . माझ्या सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रांतातील मानवाला मिळालेले हे वरदानच नव्हे काय ? मागील दहा दिवसापासून अंघोळीच्या झालेली हेळसांड भरून काढण्याच्या हेतूने कुठचा ही विचार न करता सरळ दोन बदल्या गरम पाणी अंगावर ओतून घेतले . दहा दिवस अंगावर साठलेला धुराळा धुऊन काढत , पुन्हा दोन बादल्या अंगावर ओतून घेत मनसोक्त अंघोळ केली . वीस वर्षापूर्वी सासुरवाडीतल्या बाय बापड्यानी लग्नाच्या निमित्ताने हळदीच्या लेपाने माखलेले अंग धुऊन काढताना घातलेल्या आंघोळी नंतर मिळालेल हे दुसरंच चैतन्य पूर्ण स्नान . स्नान आटोपल्या नंतर कैलास पती श्री शंकराला मनोभावे नमन करत सरहान चा रस्ता धरला . ज्यूरीच्या दक्षिणेकडील डोंगर रांगेत १७ कि मी अंतरावर सरहान स्थित भीमकाली देवीचे मंदिर आहे . डोंगर रांगेची उंची कमी ( २१६५ मी ) असल्यामुळे बर्फ़ाचे प्रमाण नव्हते त्या मुळे सर्व पर्वत आणि व्हॅलीतला परिसर हिरव्याकंच गर्द वनराईने भरला होता . सफरचंदा नी लागडलेल्या बागा मधून आणि रस्त्याच्या कडेने बहरलेल्या गुलाबाच्या ताटव्या मधून , गुलाबाच्या सुगंधावर स्वार होत आम्ही तुलनेनी सोपी असलेली वळणे पार करत ; हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर असलेल्या आर्मी कॅम्प च्या परिसरामधील शिवछत्रपती च्यां पुतळ्याला मुजरा करून सरहान मध्ये पोहचलो . वृक्ष वेलींनी अन् डोंगर रांगानी नटलेलं हे गुलाबपुष्प ग्राम म्हणजे धर्तीवर आवतरलेला स्वर्गच जणू . दुतर्फा वेलींनी आणि गुलाबानी नटलेल्या रस्त्यानेच मंदिराकडे जाता येते . निसर्गाने दिलेले कमी म्हणून की काय ? पण संपूर्ण मंदिराच्या बाजूने पण उद्यान उभारलेले आहे . मंदिराची बांधणी खूप वेगळ्या पद्धतीची आहे . साधरणतः आपल्या कडे मंदिर कळसाच्या बाजूला निमुळते होत जाते , पण हे मंदिर कळसाच्या बाजूने विस्तारत गेलेले आहे . दरवाजातून आत प्रवेश केल्या नंतर उजव्या बाजूला काळभैरवाचे मंदिर आहे . डाव्या बाजूला भव्य दिव्य कमानीतून प्रवेश केल्यानंतर समोरच्या मोकळ्या जागेत भव्य दिव्य असे मंदिर आहे . पण मंदिरात जाण्या अगोदर तुमच्या कडील चामड्याच्या सर्व वस्तू , मोबाईल इ . लॉकर मध्ये जमा करून व लाल टोपी परिधान करूनच पुढे जावे लागते . मंदिरात प्रवेश केल्या नंतर समोर तुम्हाला देव न दिसता फक्त वर जाण्याचा जिना दिसेल . जिन्याने वेढे घालत वर गेल्या नंतर तुम्ही मंदिरात पोहचता . मंदिरातील वातावरण खूप पवित्र आणि स्वच्छ आहे . गोंगाट नाही , गर्दी नाही . पुजारी प्रत्येकाला पुढे बोलावून देवीच्या चरणाशी नतमस्तक होण्यास मदत करतात . आपल्या कडील मंदिरात मात्र पुजारी धक्के देऊनच बाहेर काढतात . मला मात्र नेहमी प्रश्न पडतो , आपण मंदिरात देवा चरणी लिन होण्यास जातो की, पुजाऱ्याचे धक्के खाण्यास जातो ? हल्ली मी गर्दी असेल तर देवाला बाहेरूनच तोंड न दाखवता पायरीची धूळ मस्तकी लावून निघून येतो . येथे मात्र या उलट होते . ना पैशाची मागणी ना धक्का बुक्की . सर्व कसे प्रसन्न . बुशहर राजवंश ची कुलदैवत आणि ५१ शक्तिपीठा पैकी एक असलेली भीमकाली माता प्रसन्न वदनाने बैठ्या रुपात सरहान मध्ये विराजमान आहे . मनोभावे देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा अंतःकरण शुद्ध झाल्याची अनुभूती मिळाली . भीमकाली मंदिराच्या बाजूला भगवान रघुनाथ आणि नारसिंहांचे मंदिर आहे . मंदिराच्या बाहेर विविध प्रकारच्या रंगी बेरंगी गुलाबाची झाडे आहेत . मंदिरासह सरहान मध्ये पाहिलेल्या गुलाबांच्या फुलांचा आकार तुलनेने प्रचंड मोठा असल्यामुळे सरहान चे गुलाब आकर्षक आणि लक्षवेधक ठरतात . हिमालयीन प्रवासातील हिरव्यागर्द आणि सुखावणाऱ्या प्रवासाचा शेवट करत आम्ही पुन्हा ज्युरी ला पोहचलो . आता आमचा या पुढचा प्रवास खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास चालू होणार होता . हिमालयाच्या प्रवासातील आठवणींचा अनमोल ठेवा म्हणून जतन करावेत असे हे दहा दिवस कधी भुर्रकन उडून गेले ते कळलेच नाही . मोबाईल ला रेंज आल्यामुळे घरच्या आणि कंपनीच्या बातम्या कानावर आदळू लागल्या , मोबाईल ची रिंग – रिंग चालू झाली तसे घराच्या अनामिक ओढीने मन ही व्याकुळ होत गेले . अशातच परतीची गाडी पकडली , पण ज्युरी मध्ये स्थानिक प्रशासनाने सतलूज नदी ला पूर येणार असल्याची सूचना दिल्यामुळे शिमल्याच्या दिशेने प्रयाण करणे आता क्रमप्राप्त झाले होते . मनात ही कुठे तरी भिती होतीच , गेल्या दहा दिवसाच्या आनंदी क्षणाला कुठे काळी किनार लागणार तर नाही ना ? आम्ही रामपूर सोडून नारकंण्डा च्या दिशेने निघालो तेव्हा सतलूज ने रंग बदलण्यास सुरुवात केली होती . गढूळ पाण्याचे लोट पुढे लोटत सतलूज आक्रमक होऊ पाहत होती . पण काही वेळातच आमची गाडी रामपूर च्या पुढील सतलूज वरचा पूल पार करून नारकंण्डा च्या चढणीला लागली . घाटातून दिसणारी सतलूज जरी काही क्षणासाठी आक्रमक झालेली दिसत असली तरी ; स्वतः चे नाव गाव विसरून ज्या प्रमाणे एखादी नववधु दुसऱ्या घरा मध्ये लक्ष्मी च्या पावलांनी प्रवेश करून संपूर्ण घराचे मंगल करते . तसेच ही सतलूज सुद्धा तिबेट मधले स्वतःचे नाव विसरून तिबेट बोर्डर ते भाक्रा-नांगल पर्यंत आनंत खच खळगे पार करत थक्क करणारा तिचा प्रवास सुद्धा हिमाचल , पंजाब , हरियाणा राज्यांचे मंगल करूनच संपतो . आशा या मंगलदायी सतलूज मातेला नमन करत नारकंण्डा च्या दिशेने रवाना झालो . सूर्य पर्वता आड विसावून सर्व दूर अंधाराचे साम्राज्य पसरत चालले होते त्यामुळे आजचा मुक्काम नारकंण्डाला होणार हे नाकी होते . बस मध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे थोड्या उशिरानेच नारकंण्डा मध्ये पोहचलो . आणि हिमालयातील पहिल्या वहिल्या मुक्कामाला पुन्हा उजाळा देत अंधाराच्या साम्राज्यात सामावून गेलो .
आज पुन्हा नारकंण्डा ची रम्य सकाळ अनुभवत सर्वजण पुढच्या प्रवासाला तयार झाले होते , पण हाथूपिक वर जाण्याचा मोह आवरणे सर्वांना कठीण झाले . हाथूपिक ला जाण्याच्या इराद्यानेच नारकंण्डा च्या चौकात दाखल झालो . पण पुन्हा एकदा हाथूपिक ने धुक्याला सोबती घेत हुलकावणी दिली . शेवटी नशिबाला दोष देत शिमल्या साठी जाणारी बस पकडली . पूर्वेकडून येणाऱ्या किरणांनी धुक्याला अलगद पणे दूर करण्यास नुकतीच सुरुवात केली होती, पण ड्रायव्हर धुक्याची तमा न बाळगता शिमल्याच्या दिशेने सुसाट वेगात निघाला होता . मी पण वेगावर स्वार होत शिमला - नारकंण्डा परिसराची उजळणी करण्यात दंग होतो . मताना , ठियोग मार्गे बस ने दोन तासाच्या प्रवासा नंतर शिमला गाठले .पाठीच्या माणक्याला थोडी विश्रांती मिळावी म्हणून बॅग चे ओझे बस अड्डया वरील लॉकर मध्येच ठेऊन, दहा दिवसाचा विरह सहन केलेल्या धर्म पत्नीला शिमल्याची काहीतरी भेट द्यावी या उद्देशाने शिमल्यामध्ये खरेदीस निघालो . पण येथे ही नशीब आडवे आले , अन् भगवान शंकारने तिसरा नेत्र उघडत धुव्वाधार पर्जन्यवृष्टी ला सुरवात केली . पाऊस काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती . खरेदीने हुलकावणी दिल्यामुळे बायको मात्र तिसरा नेत्र उघडणार यात काही शंका नव्हती , पण “ दिल्ली बहोत दूर नही ” म्हणत वेळ मारून नेली , आणि कालका जाणारी बस पकडली . आणि सोलन मार्गे जाण्याचा हाट्ट भास्कर मोरे यांनी घरला . त्याचे कारण ही घडले तसेच , ३० तारखेला प्रवासा दरम्यान सोलन बस अड्डयावर काही झेरॉक्स काढतेवेळी भास्कररावांचे ड्रायव्हिंग लायसन विसरले . तत्परता दाखवत बस मधिल कंडक्टर ला नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायला लावून ते लायसन परतीच्या प्रवासात घेऊन जाण्याच्या अटीवर नियंत्रण कक्षात जमा करण्याची विनंती केली होती . आम्ही ही शब्दाचे पक्के म्हणून सोलन ला जाण्याचा हा हाट्ट योग.
सोलन मध्ये मिळालेल्या लायन्स वर भास्कररावांच्या दिशेने संवाद फेक करत कालका च्या दिशेने निघालो . पाठीमागे आकाशात प्रचंड प्रमाणात ढगांची दाटी झालेली दिसून येत होती . काही तरी आगळीक घडणार याची कल्पना येत होती . आणि घडलेही तसेच येथे प्रचंड प्रमाणात ढग फुटी झाली . पण आम्हाला हे यथा अवकाश कळाले . गाडीने भर पावसात वेग घेतला , चिंब भिजून ओथंबून वाहणार हिमालय ही या क्षणी पाहायला मिळत होता . पण हे नक्की ; हिमालयाचा काही नेम नाही . क्षणात मूड बदलणार निसर्ग या ठिकाणी पावलो पावली जाणवत होता . पण हे ही तितकेच खरे आहे की ; त्याच्या या अवखळ पणा मुळे त्याची सुंदरता कुठेही कमी होत नाही किंवा त्याच्या वर प्रेम करणाराचे प्रेम तसूभर ही कमी होत नाही . असा हा अवखळ पण संपूर्ण भारत देशाला मान्सून चे वारे आडवून चिंब पावसात भिजवत सूजलम सुफलाम करणारा , भारताचा ताज नव्हे - नव्हे पृथ्वीवरील स्वर्ग , पर्वतराज हिमालय . ज्याच्या अंगा खांद्यावर गेले दहा दिवस जे आनंदाचे क्षण लुटले , धमाल केली , मस्ती केली , डोळे भरून त्याच्या सुंदर रूपाची अनुभूती घेतली असा हा पर्वत राज उतरून आम्ही १० मे च्या रात्री कालका मध्ये पोहचलो .
कालका मध्ये न थांबता दिल्ली गाठण्याचा बेत आखला . नव्हे तो पुण्यातूनच जेष्ठ गिर्यारोहक प्रविण दादा पवार यांनीच रेल्वे तिकीट बुकिंग च्या माध्यमातुन आखून दिला . गाडीला वेळ असल्यामुळे कालका मध्ये पावसाच्या रिपरिपीत थोडी फार भटकंती करून रात्री १२:०० वा सुटणाऱ्या कालका एक्स्प्रेस ने दिल्ली च्या दिशेने प्रस्थान ठेवले . आणि दिवसभराच्या प्रवासने थकलेले शरीर निद्रेच्या आहारी कधी गेले ते कळलेच नाही . सकाळी ७:०० वा गाडीतील लगभगी मुळे जाग अली तेव्हा लक्षात आले की आपण दिल्ली गाठली . प्रचंड गर्दी अन् गोंगाटा मध्येच ओल्ड दिल्ली स्टेशन वर उतरलो . रेल्वे स्टेशन वर उतरल्यानंतर , विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते , तसे ते येथेही घडले . कोई बंगाली , कोई सिख - इसाई तो कोई मद्रासी . आशा या यात्रेत “ मी मराठी ” म्हणत आम्हीही सामील झालो . अन् कधी यु पी वाल्या भैय्या चे तर कधी बिहारी बाबू चे धक्के खात स्टेशन बाहेर पडलो . हिमालया प्रमाणे तसी दिल्ली ही माझ्या साठी नवीनच . तेव्हा जास्त डोक्याला ताण न देता रांगेतली मधली जागा पकडली आणि मेट्रो च्या स्टेशन मध्ये शिरकाव केला . दिल्ली मेट्रो हा शब्द कानावर पडता क्षणी प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंचावते . आणि ती का नाही उंचवावी ? आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभे केलेले मेट्रो चे जाळे . दर मिनिटाला धावणारी मेट्रो , चकाचक अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन्स , आधुनिक तंत्रज्ञाना चा वापर करून तिकीट चोरांना घातलेला पायबंद , आधुनिक सूचना फलक , सुरक्षेशी कुठेही तडजोड नाही आणि सर्वात विशेष म्हणजे विमानाच्या तोडीची अंतर्गत रचना आणि स्टेशन संबधी सूचना देणारी आधुनिक जी पी एस यंत्रणा आशा सर्व सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानानी परिपूर्ण दिल्ली मेट्रो . पाहता क्षणी प्रेमात पडावे अशीच . नवी दिल्ली पर्यंतचा काही मिनिटाचा मेट्रो प्रवास शरीराचा क्षीण घालवणारच ठरला . आज दिल्ली मध्ये थांबून आम्ही उद्या सकाळी पुण्या कडे प्रस्थान करणार होतो . त्या मुळे आजचा संपूर्ण दिवस दिल्ली साठी राखीव होता . नवी दिल्ली स्टेशन समोर एक हॉटेल मध्ये रुम घेऊन काही वेळ अराम करून दिल्ली दर्शन साठी बाहेर पडलो . शिल्पकलेचा शाश्वत नुमुना म्हणजे दिल्लीचे बिर्ला मंदिर अतिशय भव्यदिव्य आखीव रेखीव बांधकाम आणि कायम पर्यटकांच्या गर्दीने फुललेले मंदीर पाहून पुढे राष्ट्रपती भवन , संसद भवन तसेच दिल्लीच्या राजकारणा मध्ये मानाने मिरवणाऱ्या हैद्राबाद भवन , वायू भवन , विज्ञान भवन इ . भावनांचे धावते दर्शन घेत ; इंडिया गेट , अमर जवान ज्योती , कुतुबमिनार , लाल किल्ला अशा अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत शेवटी बापूजींच्या समाधी स्थळा वर नतमस्तक होऊन थेट कॅनॉट प्लेस गाठले . वर्दळीने गजबजलेले हे ठिकाण म्हणजे दिल्ली करांची खरेदी साठी ची पंढरीच . भव्य मोठ्या परिसरामध्ये वर्तुळाकार रचनेत वसवलेली आधुनिक बाजार पेठ . पालिका बाजार सह असे अनेक मॉल्स आणि दुकाने ग्राहकांच्या गर्दीने कायम ओसांडून वाहत असतात . शिमल्या मध्ये खरेदीची राहिलेली कसर या निमित्ताने भरून काढण्याचा योग आला . मनसोक्त खरेदी नंतर “ बहोत खूब दिलवालो की दिल्ली ” म्हणत सर्वांनी हॉटेलचा रस्ता धरला .
१२ मे आज मात्र सर्वांनाच घराचे वेध लागले होते , आणि विमान ही सकाळी लवकर असल्यामुळे भल्या पहाटेच मेट्रो ने विमानतळा कडे प्रयाण केले . ३० मि . सुसाट प्रवास करून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले . पण तेथे पोहचल्या नंतर समजले की ; येथून फक्त आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाण घेतात डोमेस्टिक साठी चे विमानतळ वेगळे आहे . आणि मग चुकलेल्या कळपाचा आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय असा प्रवास चालू झाला . शेवटी विमानतळ सापडले अन् जीव भांडयात पडला . कडक सुरक्षेच्या तपासणीचे सोपस्कर पार पाडून आत प्रवेश मिळवला . पण बॅग तपासणी मध्ये आमच्या कडील बिटॉन गॅस ( हिमालयामध्ये बर्फात पाणी गरम करण्यासाठी वापर करतात ) चे सिलेंडर सापडल्या मुळे सुरक्षा रक्षकांच्या चौकाशीला सामोरे जावे लागले . पण खऱ्या खुऱ्या माहितीच्या आधारावर आणि गिर्यारोहक असण्याचा फायदा मिळवत , राजेश चिंचवडे चौकशीच्या कचाट्यातून लगेच बाहेर आले . म्हणजे थोडक्यात थर्ड हांपायर ने ‘ बेनिफिट्स ऑफ डाऊट ’ च्या आधारावरच निर्णय दिला , पण बिटॉन च्या सिलेंडर वर मात्र पाणी सोडावे लागले . मंजुळ आवाजात उद्घोषणा झाली . पुणे की ओर जाणे वाले सभी यात्रियों की सूचीत किया जात हैं । स्पाईस जेट का हवाई जहाज पुणे की और उडान भरणे के लिए तयार हैं ....... उद्घोषणा पूर्ण होण्याच्या आत आम्ही पुन्हा एकदा भल्या मोठ्या पंखाच्या आश्रयाने विमानात प्रवेश केला . प्रवेश द्वारात उभ्या असलेल्या सुंदर चेहऱ्याच्या हवाई सुंदरीने सुहास्य वदनाने स्वागत केले . अन् नशिबाने मिळालेली विंडो सिट बळकावत स्थानापन्न झालो .काही क्षणातच हावाई सुंदरीच्या माध्यमातून सुरक्षा सूचनांची कवायत पार पडली . तसे विमानाने ही मुख्य धावपट्टी वर येत जोरात आवाज करून सुसाट धाव घेतली अन् पुण्याच्या दिशेने झेपावले . आकाश निरभ्र असल्या मुळे दिल्ली चे हावाई दर्शन घेण्याची संधी मिळाली . माणसाच्या गर्दीने व वाहनाच्या वर्दळीने तुडुंब भरून वाहणारे रस्ते शांत आणि संयमी वाटत होते . धूर सोडत अनेक डब्यांना ओढत घेऊन जाणारे रेल्वे इंजिन आवाज न करता सापाच्या गतीने धावताना दिसत होते . नागमोडी वळणे घेत वाट शोधात निघालेल्या यमुना माईचे लाखाखणारे पाणी संथ आणि शांत वाहत होते . दिल्ली च्या या विहंगम दृष्याचा फार काळ अनुभव घेता आला नाही . जे मिळाले त्या वर समाधान मानत दक्षिणेकडे झेपावलेल्या विमानाच्या खिडकीतून थरथरणाऱ्या पंखानकडे एक टक पाहत प्रवासाचा आनंद लुटू लागलो . जमीनीवरून ढगांकडे पाहण्याच्या आनंदा पेक्षा , ढगातून ढगांकडे पाहण्याचा आनंद काही औरच . क्षितिजा वरती पांढरे शुभ्र ढग म्हणजे विदर्भातील कापूस केंद्रावर रचून ठेवलेली पांढऱ्या सोन्याची गंज च जणू . नव्हे - नव्हे अवलिया चित्रकारने निळ्या कॅनव्हास वर गोल गोल फिरवलेला पांढरा ब्रश जणू . खरे तर माझ्या सारख्या ने त्याचे वर्णन करणे म्हणजे ; काजव्याने सूर्याची बरोबरी केल्या सारखे किंवा टिटवीने समुद्र उपसल्या सारखेच नाही का ? पण काही गोष्टी अनुभवणेच इष्ट . विमानाने उड्डाण घेऊन साधरणतः एक तास झाला होता , प्रवास शेवटच्या टप्याकडे पोहचत होता . उन्हाळ्याचे दिवस असल्या मुळे खिडकीतून उन्हाची किरणे प्रखर पणे जाणवत होती , मात्र खाली धरतीवर ; कधी दुष्काळात होरपळत असलेली ; तर कधी हिरवाईने नटलेली खेडी क्षणाक्षणाला रंग बदलत होती . तर मध्येच आमीबा सारखा आकार बदलणारे लहान मोठे जलाशय डोळ्यांना सुखावत होते , अन् मध्येच दिसणाऱ्या डोंगर रांगा आपल्या अक्राळ विक्राळ रुपाला मूरड घालून आपल्याच सौंदर्यात मशगुल होत्या . आणि मी मात्र सातपुडा असेल की विंध्याचल , सरदार सरोवर असेल की माही डॅम यांचे मनात आराखडे बांधण्यात व्यस्त होतो . काही वेळानंतर विमानाची उंची कमी झाली आणि आत्ता पर्यंत गुगल मॅप प्रमाणे दिसणारे दृश्य ; अवतार मधल्या थ्री डी प्रमाणे दिसू लागले . भूप्रदेश ओळखीचा वाटू लागला . सह्याद्रीचे उंच कडे आणि गंडकोटांचे अभेद्य बुरुज महाराष्ट्र आगमन झाले असल्याची वर्दी देऊ लागले , अन् तांबड्या मातीचा सुगधं आपलासा वाटू लागला , भीमा , इंद्रायणीच्या दर्शनाने आत्मानंद टाळी वाजली अन् हावेत घिरट्या घेणाऱ्या स्पाईस जेट ने सिमेंट च्या जंगलाला खुणावत लोहगावची धावपट्टी शिवली .आणि सह्याद्री ते हिमालय आणि हिमालय ते सह्याद्री वारी ची सांगता झाली . वारी एव्हढ्या साठीच म्हटले आषाडी - कार्तिकीची वारी करणारा वारकरी जसा पुन्हा पुन्हा सावळ्या पांडुरंगाच्या प्रेमात पडतो आणि न चुकता वारी करतो . गिर्यारोहकांचे तरी काय वेगळे आहे ? एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलेला गिर्यारोहक पुन्हा - पुन्हा आपली पावले देवभूमीच्या दिशेने वळवतो . आणि का नाही वळवावी ? गेले चौदा दिवस जो हिमालयाचा सत्संग जडला , मणभर पण कणखर अनुभव या मोहिमेतून मिळाला . रोज नवनवी क्षितिजे पाहायला मिळाली , घाट माथ्यावरून अन् दऱ्याखोऱ्यातून फिरताना अनेक नवी माणसे भेटली , मनाचा च नव्हे तर शरीराचा ही दणकट पणा वाढला . माणूस फक्त शरीरानेच गोरा नसतो तर मनाने ही गोरा असतो हे हिमालयीन माणसाच्या सहवासातून जाणवले . असा हा प्रचंड हिमालयाच्या उंचीचा आनंद आणि अनुभव; प्रवास रुपी जीवनाच्या गाठोड्यात , आणि ह्रदयाचा दर्शनी भागात अत्तराच्या कुप्पी प्रमाणे साठवून ठेवत , दोन नंबर बेल्ट वर आलेली बॅग पाठीवर टाकून घराच्या दिशेने रवाना झालो , ते पुन्हा हिमालयाच्या कुशीत परतण्याच स्वप्न उराशी बाळगुनच .

लेखक : शिवाजी महादेव आंधळे .
भ्रमणध्वनी : ९८५०५५५९५२. ई-मेल : shivaandhale.75@gmail.com

About the Author

By admin / Administrator, bbp_keymaster on Sep 22, 2016

No Comments

Leave a Reply